शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

दरोडेखोरांच्या हल्ल्यात सॅँडलचाही वापर..

By admin | Updated: October 29, 2014 00:10 IST

कुटुंब अजूनही दहशतीखाली : खटाव तालुक्यातील अंबवडे, नढवळ दरोडा प्रकरणाचा तपास सुरुच

शेखर जाधव - वडूज -रविवारच्या मध्यरात्रीच्या घटनेने अंबवडे व नढवळ गावातील पवार व झेंडे कुटुंबावर दिवाळीतील भाऊबीजेनंतरची मध्यरात्री ही काळ रात्र ठरली असून आजही त्या कुटुंबाला त्या क्षणाची आठवण झाली तर त्यांच्या नजरा भेदरलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.खटाव तालुक्यातील अंबवडे आणि नढवळ गावात रविवारी मध्यरात्री दरोडेखोरांना धुमाकूळ घालत पिता व मुलीस जखमी करून सुमारे पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. सदर घटनेचे सविस्तर वृत्ताची माहिती देताना अंबवडे येथील आटोळी वस्तीवर राहणाऱ्या सुभाष साहेबराव पवार यांनी सांगितले की, रविवार, दि. २६ रोजी दुपारी दोन वाजता अंबवडे येथील मित्रांकडून ट्रॅक्टरला पलटी घेण्यासाठी ४० हजार रुपये घेऊन यायचे व शेतीची उर्वरित कामे करायची म्हणून रात्री उशिरा ते आपल्या मुली माधुरी, अश्विनी, अनुराधा व पत्नीसह छोटेखानी घरात झोपले. मध्यरात्री १२.४५ वाजता घरात कोणतरी घुसले असल्याचे लक्षात येताच समोर पाहतोय तर पत्नीकडे गळ्यातील व कानातील एक अज्ञात इसम मागणी करत असल्याचे ऐकून सुभाष पवार यांच्यासह मुलींना जाग आली. मुलगी माधुरी (वय १५) ही ओरडू लागताच तिच्या चेहऱ्यावर सॅडल फेकून मारला. त्यामध्ये तिच्या उजव्या डोळ्याखाली जखम झाली. सुभाष पवार यांनी एका चोरट्याचा पाय धरून ठेवला असता त्या चोरट्याने पाय सोडवून घेण्यासाठी सलग दोन चाकूचे वार हातावर केले. तरीही पाय सोडत नसल्याचे पाहून त्या चोरट्यांनी तिसऱ्यांदा जोरवार वार केल्यानंतर तो वर हाताच्या हाडापर्यंंत पोहचल्यावर पवार जोर जोरात ओरडू लागले. हा आवाज ऐकताच रस्त्यापलीकडे वास्तव्यास असणारे दत्तू पाटील हे धावून आल्याचे पाहताच आत दोन आणि बाहेर दोन असणारे चोरटे पवार यांच्या शेतातून पळून गेल; परंतु पळून जाण्यापूर्वी कपाटातील ४० हजार व दोन मोबाईल, घड्याळ घेऊन गेले. मुंबईला नोकरीसाठी वास्तव्यास असणारे श्रीकांत, सूर्यकांत व सचिन हे तीन बंधू गावी आले होते. त्यांचे आई-वडील भाऊबीजेसाठी मुंबईला गेले होते. नुकतेच मुंबईहून आल्याने श्रीकांत व सूर्यकांत यांनी आपल्या सुटकेस घरातील खाटेवरच ठेवल्या होत्या. दोघेही आपल्या पत्नी व मुलाबाळासह माजघरात झोपले होते तर सचिन हा सोप्यात झोपला होता. मध्यरात्री २.२० च्या दरम्यान मात्र घरात कोणीतरी आल्याची चाहूल श्रीकांत यांना लागली असता प्रारंभी त्यांना वाटले सचिनच आला आहे; परंतु समोर पाहतोय तर दोघेजण उभे त्यातील एकाने डोळ्यावर बॅटरी मारल्याने त्यांचे चेहरे स्पष्ट दिसू शकले नाहीत. आरडा ओरडा झाल्याने ते पसार झाले. ते पांढऱ्या रंगाच्या ओमिनीमधून पळून गेले. जाताना त्यांनी मोबाईलच्या बॅटऱ्या काढून मोबाईल तेथेच टाकला. (प्रतिनिधी)तिघी बहिणी व आईसोबत झोपले असताना कोणाच्यातरी आवाजाने मला जाग आली. पाहते तर समोर आईच्याकडे गळ्यातील व कानातील मागणी केल्यानंतर हे चोरटे असणार, त्यामुळे आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली, तर त्यातील एकाने मला सॅडल फेकून मारल्याने गालावर जोरात लागल्याने मी रक्तबंबाळ झाले. वडिलांच्यावरही चाकूने वार केल्याने घाबरलेल्या अवस्थेत आम्ही जोरात ओरडलो. हे पाहून चोरटे पसार झाले; परंतु त्या क्षणाची आजही आठवण आली तर खूप भीती वाटते. -माधुरी पवार