शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

करणीच्या नावाखाली फोटोंचा वापर अंधश्रद्धेला खतपाणी : अमावस्येला लिंबू, मिरचीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 01:04 IST

एकविसाव्या शतकात आजही अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे अमावस्येला ठिकठिकाणी आजही लिंबू, मिरचीचा उतारा पाहायला मिळत असतोे.

ठळक मुद्दे; नागरिकांमध्ये चर्चा

जावेद खान।सातारा : एकविसाव्या शतकात आजही अंधश्रद्धेला खतपाणी मिळत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे अमावस्येला ठिकठिकाणी आजही लिंबू, मिरचीचा उतारा पाहायला मिळत असतोे. मात्र साताऱ्यात नुकत्याच झालेल्या अमावस्येला येथील कृष्णा पुलाच्या खाली करणीच्या नावाखाली लिंबू अन् नारळाबरोबर काही फोटोही अर्धवट जळालेल्या स्थितीत पाहून नागरिकांमध्ये दिवसभर उलट सुलट चर्चा सुरू होती.

बुधवारच्या मध्यरात्री अमावस्या संपल्यानंतर सकाळी या ठिकाणी काही व्यावसायिक गाडी लावत असताना या उताºयावर नजर पडली असता आपल्या व्यवसायावर कोणीतरी करणी करत असल्याची समज करून त्याने मोठमोठ्याने शिवीगाळ करत गोंधळ एकच घातला होता.

यानंतर करणी कशी असते, हे पाहण्यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी न घालणाºया एका व्यक्तीने या उताºयाची टोपली उचकटून पाहिली असता त्यामध्ये सदर बझार येथील एका कुटुंबीयातील सदस्यांची अर्धवट जळालेली फोटो आढळून आले. बाँबे रेस्टॉरंट येथील कृष्णा पुलाखाली एका कोपºयात या करणीच्या नावाखाली पाटी ठेवण्यात आली होती. यामध्ये २० ते २५ लिंबू, पाच-सहा नारळे, खिळे, टाचण्या, घोड्याची नाल, चार-पाच काळ्या बाहुल्या, बुक्की, भंडारा, जळालेली कपडे आदी वस्तूंचा यात समावेश करून एका मडक्यात या कुटुंबीयाच्या सदस्यांचे फोटो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा प्रकार पाहून अनेकांनी लांबूनच रामराम ठोकला, तर काहीजण अंधश्रद्धेचा हा भाग असल्याचे समजावून सांगत होते.

दरम्यान, या मडक्यात अर्धवट जळालेले फोटो पाहून याबाबतची माहिती एका वाहनचालकाने संबंधित कुटुंब प्रमुखाला दिली असता ते तातडीने त्या ठिकाणी येऊन पाहिले. त्यांनीही अंधश्रद्धा असल्याचे सांगत त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु या मडक्यात घरातील काही महिला सदस्यांचे फोटोही सुया टोचून ठेवल्याचे सापडले. कुटुंबीयाने ही बाब गांभीर्याने घेऊन जो कोणी हे कृत्य करत असेल त्याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा नोंदवणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अंधश्रद्धेच्या नावाखाली आजही अनेक भोळ्या भाबड्या लोकांना लुटले जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या सातारा जिल्ह्यात आजही अमावस्येला लिंबू-मिरचीचा उतारा विकणारे रस्त्यावर विक्री करताना दिसत आहेत. समाजप्रबोधन करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहेत.कपडे अन् फोटोआले कुठूनघरात वापरण्यात येत असलेल्या काही कपड्यांची तुकडे तर मोबाईलवरून काढलेले फोटोही सापडल्याने हे फोटो व कपडे या ठिकाणी कोणी आणले असावेत, असा प्रश्न उपस्थितांमधून होत होता. हा अंधश्रद्धेचा भाग असला तरी घरातील कपडे व फोटो जवळच्या व्यक्तीचे हे कृत्य असल्याची शक्यता कुटुंब प्रमुखांनी वर्तवली आहे.आमच्या कुटुंबीयाचे फोटो असल्याची माहिती मिळाली, नेमका काय प्रकार आहे, हे पाहायला या ठिकाणी आलो असता, घरातील पुरुष सदस्यांबरोबर महिलांचेही या ठिकाणी फोटो मिळाले. यामुळे याची गंभीर दखल घेऊन संबंधितावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा नोंद करणार आहे.- चेतन सोळंखी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदी