उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST2021-01-23T04:40:52+5:302021-01-23T04:40:52+5:30
औंध : दुष्काळी भागाची वरदायिनी असणाऱ्या उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात आले असून, शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे फॉर्म भरून द्या, ...

उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात पोहोचले
औंध : दुष्काळी भागाची वरदायिनी असणाऱ्या उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात आले असून, शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे फॉर्म भरून द्या, असे आवाहन काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे.
रब्बी हंगामातील पिकांसाठी उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी रणजितसिंह देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानंतर देशमुख यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली करून लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी लावून धरली होती. बुधवार, दि. २० रोजी पाणी सोडण्यात आले असून, खटाव तालुक्यात पाणी पोहोचल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पिकांना पाणी देणे चालू असल्याने पाणीपातळी आता खालावली असून, तालुक्यातील रब्बी हंगामासाठी पाणी येणे गरजेचे होते. त्यासाठी शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत होते. आता पाणी आल्याने पिकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागणी फॉर्म भरून द्यावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
फोटो : रणजितसिंह देशमुख.