उरमोडीच्या पाण्याचाच ‘जय हो’

By Admin | Updated: October 19, 2014 22:45 IST2014-10-19T22:21:05+5:302014-10-19T22:45:17+5:30

अनेक मातब्बर उमेदवार, सर्वांवर मात करत सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने जिंकत गोरे पुन्हा

Urmodi water is 'Jai Ho' | उरमोडीच्या पाण्याचाच ‘जय हो’

उरमोडीच्या पाण्याचाच ‘जय हो’

म्हसवड : माण विधानसभा मतदारसंघात अनेक मातब्बर उमेदवारांनी निवडणुकीत नशीब आजमावले, या सर्वांवर मात करत सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकत जयकुमार गोरे यांनी पुन्हा ‘जय हो’चाच नारा दिला. एकप्रकारे हा उरमोडीच्या आणलेल्या पाण्याचाच विजय असल्याच्या प्रतिक्रीया आहेत. माण विधानसभा मतदारसंघात ३ लाख ९ हजार ४४२ इतके मतदार होते. त्यामध्ये २ लाख १७ हजार ७८३ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यामध्ये माणमधून १ लाख २११ हजार ७८४, तर खटाव मधून ८९ हजार ९९९ मतदारांचा समावेश होता. या मतदानात सुमारे ३७ हजार ७८५ जादा मतदान खटाव तालुक्यापेक्षा माण तालुक्यात झाले होते. त्यामुळे माण तालुक्यात सर्वाधिक उमेदवार, तर खटाव तालुक्यातून एकच उमेदवार असल्याने अंदाज व्यक्त करता येत नव्हता. परंतु जयकु मार गोरे यांनी सर्व राजकीय अंदाज वर्तवणाऱ्यांना फोल ठरवत पुन्हा विजयश्री खेचून आणत ‘जय हो’ फॅक्टर पुन्हा आणला. पहिल्या फेरीपासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जयकुमार गोरे आघाडीवर होते. ती आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत २३,३५१ मताधिक्य ठेवून ते विजयी झाले. जयकुमार गोरे यांना माण तालुक्यातून ५२ हजार ९०७ मते, तर खटाव तालुक्यातून २२ हजार ८०१ मते मिळाली. एकूण ७५ हजार ९०७ मते मिळाली. रासपचे शेखर गोरे यांना ५२ हजार ३५७ मते मिळाली. यामध्ये माण तालुक्यातून ३१ हजार ६४६, तर खटाव मधून २० हजार ७११ मते मिळाली. तर तीन क्रमांकाची मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सदाशिवराव पोळ यांना ३५ हजार ५६२ मते मिळाली. यामध्ये माण तालुक्यातून २३ हजार ३५६ मते, तर खटाव मधून १२,२०६ मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार रणजितसिंह देशमुख यांना ३१ हजार ३२ मते मिळाली. यामध्ये माण तालुक्यात ५ हजार ३६२, तर खटावमधून २५ हजार ६७० मते मिळाली. अपक्ष उमेदवार अनिल देसाई यांना १८ हजार २९१ मते मिळाली. यामध्ये माण तालुक्यातून १२ हजार १९७, तर खटाव तालुक्यातून ६ हजार ९४ मते मिळाली. माण तालुक्यातून जयकुमार गोरे यांना सर्वाधिक मते मिळाली, तर खटाव तालुक्यातून रणजितसिंह देशमुख यांना मते मिळाली. विजयी उमेदवार जयकुमार गोरे यांच्या विजयोत्सवाची सुरुवात २० व्या फेरीपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळून व फटाके वाजूवन करण्यात आली होती. जयकुमार गोरे यांची विजयी मिरवणूक मतमोजणी केंद्रापासून दहिवडीतील मुख्य रस्त्यारून गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीचा मतमोजणीचा कार्यक्रम निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार महेश पाटील यांच्या उपस्थित पार पडला. (प्रतिनिधी) सत्ताधारी, विरोधकांचा असाही योगायोग फलटण विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात आतापर्यंत निवडून आलेल्या कोणत्याही उमेदवाराला ८४ हजारांच्यावर मते मिळाली नव्हती. तर विरोधात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला ४२ हजारांच्यावर मते मिळाली नव्हती. हा इतिहास आ. चव्हाण व आगवणे यांनी मोडीत काढला. आ. चव्हाण यांना ९२,९१० तर आगवणे यांना ५९,३४२ मते मिळाली. मागील चार निवडणुकांत राष्ट्रवादीला मिळणारे ३० ते ४२ हजारांचे मताधिक्य कमी झाले. १,६५६ जणांकडून ‘नोटा’चा वापर फलटण विधानसभा मतदारसंघासाठी एकूण १ लाख ९९ हजार ५१४ प्रत्यक्ष मतदान झाले. टपाली ११४५ झाले. एकूण २ लाख ६५९ मतांपैकी १,६५६ जणांनी नोटाचा वापर केला. आमदार दीपक चव्हाण हे ३३,५६८ मतांनी विजयी झाले. विकास कामांची पावती गेली वीस वर्षे राजकीय सत्तेच्या माध्यमातुन दोन धरणे, दोन औद्योगिक वसाहती, कारखानदारी यासह पायाभुत सुविधांच्या विकासासाठी आपण परिश्रम घेतले. मतदारांनी मतदानाद्वारे विकासकामांची पोहोच पावती या निवडणुकीच्या निमित्ताने दिली आहे, अशी प्रतिक्रिया रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

Web Title: Urmodi water is 'Jai Ho'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.