उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST2021-02-05T09:09:13+5:302021-02-05T09:09:13+5:30

शिवेंद्रसिंहराजेंचा ग्रामस्थांकडून सत्कार लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोल ग्रामस्थांचा शासनदरबारी तब्बल २१ वर्षांपासून रखडलेला पुनर्वसन व ...

Urmodi project affected Venekhol | उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोल

उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोल

शिवेंद्रसिंहराजेंचा ग्रामस्थांकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोल ग्रामस्थांचा शासनदरबारी तब्बल २१ वर्षांपासून रखडलेला पुनर्वसन व गावठाणाचा प्रश्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे अखेर मार्गी लागला आहे. हा प्रश्न सोडविल्यामुळे वेणेखोल ग्रामस्थांनी शिवेंद्रसिंहराजेंचा सत्कार करून आभार मानले.

सातारा तालुक्यातील उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोलच्या पुनर्वसनअंतर्गत जमीन मागणी करणा-या खातेदारांचा प्रश्न तब्बल २१ वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित होता. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पुनर्वसनासाठी दिलेल्या लढ्यास यश आले आहे.

माण तालुक्यातील म्हसवड येथील गावठाणामध्ये ६८ खातेदारांना कब्जेपट्टी मिळाली आहे. यामुळे वेणेखोल येथील खातेदारांचा महत्त्वाचा प्रश्न सुटला आहे. यामुळे ग्रामस्थांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी वेणेखोलचे सरपंच नारायण सकपाळ, शिवराम सकपाळ, बाळकृष्ण सकपाळ, परशुराम सकपाळ, बजरंग सकपाळ, अमोल सपकाळ, बाळासाहेब सकपाळ व प्रकल्पग्रस्तांनी त्यांचा सत्कार केला.

फोटो दि.०३सातारा सुरूची...

फोटो ओळ : उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोल ग्रामस्थांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार केला. यावेळी नारायण सकपाळ, शिवराम सकपाळ, बाळकृष्ण सकपाळ, परशुराम सकपाळ, बजरंग सकपाळ, अमोल सपकाळ, बाळासाहेब सकपाळ आदी उपस्थित होते.

.....................................................

Web Title: Urmodi project affected Venekhol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.