आगामी निवडणुका स्वबळावरच : निकाळजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:43 IST2021-09-06T04:43:41+5:302021-09-06T04:43:41+5:30
सातारा : ‘सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेत पुन्हा पक्ष बांधणी सुरू केली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच विधानसभेच्या ...

आगामी निवडणुका स्वबळावरच : निकाळजे
सातारा : ‘सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेत पुन्हा पक्ष बांधणी सुरू केली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच विधानसभेच्या २८८ जागा स्वतंत्रपणे लढणार आहे. तसेच जे कोणी समविचारी बरोबर येतील त्यांनाही बरोबर घेऊन पुढे जाणार आहे’, अशी माहिती रिपाइं आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी दिली.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रिपाइं आंबेडकर गटातर्फे आयोजित निर्धार मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, पुणे जिल्हाध्यक्ष विकास साळवी, सचिन खरात, जयवंत कांबळे आदी उपस्थित होते.
निकाळजे म्हणाले, ‘काही स्वार्थी लोक बाजूला गेल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंबेडकर गट राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी निवड झाली. त्यानंतर पक्ष बांधणीला सुरुवात करत असतानाच कोरोनाचे संकट आल्याने खंड पडला. आता सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेत पुन्हा पक्षबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. वसई, विरार, ठाणे, नगर, औरंगाबाद येथे चांगला प्रतिसाद मिळाला. आता उर्वरित जिल्ह्यांत सर्व जाती-धर्मातील लोकांना सहभागी करुन घेत आहोत.
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणा एका समाजाचे नव्हते. त्यांनी केलेले कार्य विश्वासाठी वंदनीय आहे. त्यांच्या विचाराने ‘रिपाइं’ वाटचाल करत आहे. डॉ. आंबेडकर यांचे विचार सर्वत्र पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे’, असेही निकाळजे यांनी सांगितले.
\\\\\\\\\\\\\\\\\\\