सुरवडी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:30 IST2021-02-19T04:30:25+5:302021-02-19T04:30:25+5:30
फलटण : सुरवडी, निंभोरे, ढवळेवाडी परिसरात बुधवारी पहाटे चार वाजता अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी व कामगार यांच्या मनात ...

सुरवडी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
फलटण : सुरवडी, निंभोरे, ढवळेवाडी परिसरात बुधवारी पहाटे चार वाजता अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी व कामगार यांच्या मनात धडकी भरली. यावर्षी हंगामात गहू, ज्वारी, मका, कडवळ पिकांची चांगली उगवण झाली आहे. गहू पीक पुढील काही दिवसात काढणीस येणार आहे. त्यामुळे भरून आलेल्या आभाळाने शेतकऱ्यांना चांगलीच धडकी भरवली होती.
पावसासह आलेल्या जोराच्या वाऱ्याने शेतातील पिके काही ठिकाणी पडली. विशेषतः मका पिकाचे नुकसान झाले. काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले. बुधवारी रात्री उशिरा हलक्या पावसाने हजेरी लावली होती. अनेक शेतात ऊस तोडणी सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे ऊस तोडणीचे काम शेत ओले झाल्याने थांबण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसात जोर नसला तरी पावसासह वाहणारे वारे धडकी भरवत आहे. गहू काढणीस तयार असतानाच पावसाने वाऱ्यासह घातलेला धिंगाणा शेतकऱ्यांना काळजी करायला लावणारा आहे.