चंदुकाका सराफमध्ये हिऱ्यांच्या मंगळसूत्रांचे अन् स्वीटहार्ट कलेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:30+5:302021-02-07T04:36:30+5:30
सातारा : नावीन्यता व आधुनिकतेचा मेळ साधत चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स नेहमीच अप्रतीम दागिन्यांचे वैविध्यपूर्ण कलेक्शन्स सादर करीत ...

चंदुकाका सराफमध्ये हिऱ्यांच्या मंगळसूत्रांचे अन् स्वीटहार्ट कलेक्शन
सातारा : नावीन्यता व आधुनिकतेचा मेळ साधत चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स नेहमीच अप्रतीम दागिन्यांचे वैविध्यपूर्ण कलेक्शन्स सादर करीत असतात. फेब्रुवारी महिना म्हणजे जीवलगाबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा महिना. यासाठीच चंदुकाका सराफ अँड सन्स प्रेमात पडलेल्या प्रत्येकांसाठी हिऱ्यांच्या मंगळसूत्र व स्वीटहार्ट कलेक्शन सादर करत आहे.
हिऱ्यांच्या मंगळसूत्रांचे कलेक्शन या कलात्मक दागिन्यांच्या श्रेणीमध्ये आधुनिक स्त्रीला साजेल अशा मनमोहक असंख्य प्रकार चंदुकाका सराफमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये प्रत्येक दागिना सर्वोत्तम अगदी तुमच्या जोडीसारखा असेल. हा अप्रतिम दागिना तिला भेट द्या. जो ती घालू शकेल विविध समारंभांमध्ये. याचबरोबर चंदुकाका सराफ यांचे हिऱ्यांच्या मंगळसूत्रांचे हे कलेक्शन तुम्हाला आनंदी आणि खास ऑफर्स अवाक् करतील. पंधरा हजारांपासून सुरू होणाऱ्या श्रेणींमध्ये हिऱ्यांचे मंगळसूत्र व दागन्यांच्या घडणावळीवर शंभरपर्यंत सूट आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्ताने स्वीट हार्ट कलेक्शन सुरू केले आहे. यात १८ कॅरेट सोन्याच्या पेंडंटस् असंख्य प्रकारात उपलब्ध आहेत. यासाठी अवश्य भेट देण्याचे आवाहन केले आहे. (वा. प्र.)