शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्याला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा; झाडे पडली, पत्रे उडाले

By नितीन काळेल | Updated: May 10, 2024 18:45 IST

घर, शाळेचे नुकसान, वीजपुरवठाही खंडित 

सातारा : जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला असतानाच आज, शुक्रवारी दुपारनंतर सातारा शहरासह पाटण तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे नागिरकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी नुकसानच अधिक झाले. पाटणला घर आणि शाळेवरील पत्रे उडाले. तसेच रस्त्यावर झाडे पडून वाहतूक बंद झाली. वीजतारा तुटल्यानेही काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.सातारा शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढलेली. दरम्यानच आभाळ भरुन आलेले. त्यामुळे अवकाळी पाऊस होणार अशी चिन्हे होती. मात्र, हा पाऊस काही भागातच पडला. सातारा शहरात दुपारी अडीचच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला मोठमोठे थेंब पडले. त्यानंतर पावसाने जोर धरला. जवळपास अर्धा तास शहर आणि परिसरात पाऊस पडला. यामुळे बाजारपेठेत विक्रेत्यांसह ग्राहकांची धांदल उडाली. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.पाटण तालुक्यातील अनेक भागात शुक्रवारी दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळीने हजेरी लावली. पण, या वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. काळगाव परिसरात घरावरील छप्पर उडून गेले. यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य भिजले. तर एका ठिकाणी कारवर झाड पडले. यामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे.

जवळपास एक तासभर वादळी पाऊस सुरू होता. वादळामुळे तालुक्यातील मालदन, तळमावले, गलमेवाडी, मानेगाव येथे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली आहे. वीजवाहिन्यावरही झाडे पडली आहेत. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस