शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात दुपारी वाढता पारा; सायंकाळी अवकाळीच्या धारा..! 

By नितीन काळेल | Updated: March 30, 2024 16:21 IST

पावसामुळे उकाडा कमी : बच्चे कंपनीची भिजून धमाल; शेतकऱ्यांपुढे चिंता निर्माण 

सातारा : सातारा शहरवासीयांना मागील सहा दिवसापासून कडक उन्हाळ्याला सामोरे जावे लागत असतानाच शनिवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी धारा पडल्या. यामुळे उकाडा कमी झाला. तर या पावसात भिजण्याचा आनंद बच्चे कंपनीने घेतला. मात्र, या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. सातारा शहराबरोबरच जिल्ह्याचा पारा मागील सहा दिवसांपासून ३८ ते ३९ अंशाच्या दरम्यान आहे. त्यातच तीन दिवसांपूर्वी सातारा शहराचे कमाल तापमान ३९.१ अंश नोंद झाले होते. हे या नवीन वर्षातील उच्चंकी तापमान ठरले होते. त्यातच सतत पारा वाढत असल्याने दुपारच्या सुमारास कडक उन्हाचा सामना सातारावासीयांना करावा लागत आहे. तसेच उकाड्याने हैराण होण्याची वेळ आली आहे. असे असतानाच शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास सातारा शहराच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. जवळपास दहा मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले होते. तर पाऊस सुरू झाल्याने रस्त्यावरील वर्दळही कमी झाली होती. या पावसामुळे  हवेत गारवा निर्माण झाला होता. परिणामी उकाडा काही प्रमाणात कमी झाला. यामुळे सातारकर वासियांना थोडासा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या अन्य काही भागातही अवकाळी पाऊस झाला आहे. मात्र, या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला होता. काही ठिकाणीच पाऊस झाला, पण शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागले. माण तालुक्यातील काळचौंडी येथे बेदाणा भिजून नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसला. त्यातच सध्या माण, खटाव, फलटण, कोरेगावसह इतर तालुक्यातही रब्बी हंगामातील पीक काढणी आणि मळणी अजूनही सुरू आहे. त्यावरही या पावसाचा परिणाम होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमानRainपाऊसFarmerशेतकरी