शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: महाबळेश्वरला अवकाळी पावसाने झोडपले; पर्यटक, नागरिकांची उडाली तारांबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 18:12 IST

पावसामुळे स्ट्रॅाबेरीच्या फळाचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गातून चिंतेचे वातावरण

अजित जाधव

महाबळेश्वर: तापमानाचा पारा वाढत असतानाच शहर व परिसरामध्ये गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण होते. यातच आज, गुरूवार अखेर साडेतीन वाजल्यापासून महाबळेश्वर शहरपरिसरात मुसळधार अवकाळी पावसाला सुरूवात झाली. तब्बल एक तासात अवकाळी पावसाने महाबळेश्वरला चांगलेच झोडपून काढले.महाबळेश्वर शहर सोडून दोन दिवस पाचगणी, वाई याठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर आज दुपारी अचानक महाबळेश्वरमध्ये देखील पावसाने हजेरी लावल्यामुळे पर्यटक, वाहनधारकांसह विक्रेते व नागरिकांची काही काळ त्रेधातिरपीट उडाली. साडेतीन वाजल्या पासून वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तर मोबाईलचे नेटवर्क ही बंद झाले होते. यामुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांची अधिक तारांबळ उडाली.बाजारपेठ परिसरातील रस्ते, नाले पाण्याने ओसंडून वाहू लागले होते. तर बस डेप्पो परिसरात  अक्षरशा ड्रेनेज लाईन ओसंडून मैला रस्त्यावर आल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली होती. मार्च महिना सुरू असल्यामुळे महाबळेश्वरात पर्यटकाची तुरळक गर्दी होती. काही पर्यटकांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.या पावसामुळे स्ट्रॅाबेरीच्या फळाचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गातून चिंतेचे वातावरण होते. या पावसानंतर गारवा निर्माण झालेला होता. सायंकाळी वेण्णालेक, मुंबई पॅाईट, मुख्यबाजरपेठत पर्यटकाची चांगलीच वर्दळ वाढलेली दिसून आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानRainपाऊस