शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हुडहुडीची थंडी नाहीच; साताऱ्यात पुन्हा अवकाळी ढग, शेतकरी चिंतेत

By नितीन काळेल | Updated: December 6, 2023 17:01 IST

महिन्यात दोनवेळा अवकाळी पावसाने झोडपले

सातारा : डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा संपत आलातरी किमान तापमान कायम १५ अंशावर राहत आहे. यामुळे जिल्हावासियांसाठी हुडहुडीची थंडी नाहीच. त्याचबरोबर महिन्यात दोनवेळा अवकाळी पाऊस झाला असून कायम ढगाळ वातावरण राहत आहे. परिणामी शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.दरवर्षी नोव्हेंबर महिना उजाडताच थंडीला सुरुवात होते. हळूहळू थंडीचे प्रमाण वाढत जाते. नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पारा १० ते १२ अंशापर्यंंत खाली येतो. तसेच डिसेंबर महिन्यातही थंडीची लाट राहते. सलग आठ-आठ दिवस हुडहुडी भरविणारी थंडी असते. पण, यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. तसेच थंडीच्याबाबतही झाले आहे. डिसेंबर महिना सुरू होऊन सहा दिवस झालेतरी थंडीची तीव्रता कमी जाणवत आहे. यामुळे जिल्हावासीय थंडीपासून दूरच आहेत. त्यातच जिल्ह्यातील मागील एक महिन्याच्या काळात अवकाळीचा पाऊस दोनवेळा पडला आहे. यामुळे पिकांचे तसेच फळबागांचेही नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार चक्रीवादळाचा धोका निर्माण झालेला आहे. परिणामी जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांत काहीसे चिंतेचे वातावरण आहे.मागील १० दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला होता. याचा फायदा रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांना झाला. पण, सातारा आणि जावळी तालुक्यात भात आणि ज्वारी पिकाचेही नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला होता. अवकाळीत पिकाचे नुकसान कमी झाले असलेतरी ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांत चिंता कायम आहे. कारण, द्राक्ष, डाळिंबसारख्या फळबागांवर रोगाचा प्रादूर्भावक होण्याचा धाेका असतो. तसेच भाजीपाल्यावरही त्याचा परिणाम होत असल्याने रासायनिक आैषधांची फवारणी करावी लागते. या कारणाने उत्पादनावरही परिणाम होत असतो. आताही अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे.

सातारा शहरात नोंद किमान तापमान..दि. २० नोव्हेंबर १९.६, २१ नोव्हेंबर १८, २२ नोव्हेंबर १६.५, २३ नोव्हेंबर १८, २४ नोव्हेंबर १६.७, दि. २५ नोव्हेंबर २०.५, २६ नोव्हेंबर १८.१, २७ नोव्हेंबर १९.९, २८ नोव्हेंबर २१.१, २९ नोव्हेंबर १७.५, ३० नोव्हेंबर १९.६, दि. १ डिसेंबर २०.१, २ डिसेंबर १८.९, ३ डिसेंबर १८, ४ डिसेंबर १८.२, ५ डिसेंबर १७.५ आणि दि. ६ डिसेंबर १९.४

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामानFarmerशेतकरीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन