शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्यावर विघ्नसंतोषींकडून तोडफोड, पालिकेने केले होते सुशोभीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 15:34 IST

गस्त घालण्याची मागणी

सातारा : सातारा पालिकेकडून किल्ले अजिंक्यतारा परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, काही विघ्नसंतोषींकडून सुशोभीकरणासाठी वापरण्यात आलेल्या घडीव दगडांची पडझड करणे, पथदिव्यांची झाकणे चोरी करणे, असे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत.अजिंक्यतारा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. पालिकेकडून या रस्त्याचे रुंदीकरणासह काँक्रिटीकरण करण्यात आले. तसेच रस्त्याकडेला आकर्षक पथदिवे लावण्यात आले असून, नागरिकांना बसण्यासाठी आकर्षक कट्टे देखील बांधण्यात आले आहेत. मंगळाईदेवी मंदिराजवळ तयार करण्यात आलेल्या विरंगुळा कट्ट्याला घडीव काळ्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. किल्ल्यावर भटकंतीसाठी येणारे अनेक नागरिक या कट्ट्यावर काही काळ विसावा घेतात व मार्गस्थ होतात. या कट्ट्याला लावण्यात आलेले दगडांची आता काही विघ्नसंतोषींकडून मोडतोड केली जात आहेत. शिवाय पथदिव्यांवरील काचेच्या आवरणावर दगडही मारले जात आहेत. पालिकेकडून प्रथमच किल्ल्याचे उत्तम पद्धतीने सुशोभीकरण करण्यात आले आहे. हे काम किल्ल्याच्या व शहराच्या वैभवात भर घालू लागले आहे. मात्र, दुसरीकडे विघ्नसंतोषींकडून उपद्रव सुरू झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

गस्त घालण्याची मागणीपालिकेकडून अजिंक्यताऱ्यावर ५२ पथदिवे लावण्यात आले आहेत. यापूर्वी २२ पथदिव्यांच्या स्वीच वरील बिडाची झाकणे चोरीला गेली आहेत. असे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत. पालिका प्रशासनाने असे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, चार भिंती व अजिंक्यतारा परिसरात पोलिसांच्या सहकार्याने गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFortगड