कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उंडाळकर समर्थकांचे राजीनामे

By Admin | Updated: September 26, 2014 23:30 IST2014-09-26T22:42:06+5:302014-09-26T23:30:43+5:30

उंडाळकर आज अर्ज दाखल करणार : पक्ष, चिन्ह मात्र गुलदस्त्यात

Unkalkar supporters resign from Karhad South Assembly constituency | कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उंडाळकर समर्थकांचे राजीनामे

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उंडाळकर समर्थकांचे राजीनामे

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आह़े़ म्हणूनच आम्ही कऱ्हाड दक्षिण तालुका काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामा देत असल्याची माहिती तालुकाध्यक्ष जगन्नाथ माहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली़
उंडाळकर समर्थक कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी उपाध्यक्ष मनसूर फकीर, रंगराव थोरात, सचिव राजेंद्र पाटील यांची उपस्थिती होती़
मोहिते म्हणाले, ‘काका हाच आमचा पक्ष आहे़ त्यांनी अपक्ष लढायचं की, अन्य कोणत्या पक्षातून, याचा सर्व निर्णय आम्ही त्यांनाच दिला आहे़ त्यामुळे उद्या (शनिवारी) ते अर्ज भरणार आहेत़ एवढेच मी सध्या तुम्हाला सांगू शकतो़’
दिल्लीवरून लादलेल्या माणसांमुळेच काँग्रेसची दक्षिणेत पीछेहाट झाली आहे़ उंडाळकरांची उमेदवारी नाकारणाऱ्यांनी त्याचे कारण देणे गरजेचे आहे़, असे त्यांनी सांगितले़
दरम्यान, कऱ्हाड दक्षिणचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनीही आजच काँग्रेस पक्षाकडे राजीनामा पाठविला असून, ते कोणत्या पक्षातून लढणार आहेत, हा निर्णय उद्या स्पष्ट होईल़ दरम्यान, विलासराव पाटील-उंडाळकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत का? याबाबत छेडले असता ही बाब वरिष्ठ पातळीवरील आहे, तेव्हा याबाबत आम्हाला अधिक माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे जगन्नाथ मोहिते यांना यापूर्वीच पदमुक्त करण्यात आले आहे. राजेंद्र चव्हाण यांची काही दिवसांपूर्वीच तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मोहितेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही़
- आमदार आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

घड्याळ कुणाच्या हातात ?
आमदार विलासराव पाटील-उंडाळकर हे दक्षिणेतून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी चर्चा आज, शुक्रवारी दिवसभर सुरू आहे़ त्याचबरोबर खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आज दक्षिणेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेही राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे खात्रीशीर समजते. याशिवाय पांडुरंग चव्हाण व नगरसेवक सुभाष पाटील यांनीही राष्ट्रवादीकडे यापूर्वीच उमेदवारी मागितली आहे.

Web Title: Unkalkar supporters resign from Karhad South Assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.