केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा महाबळेश्वर शिवसेनेकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST2021-08-25T04:44:05+5:302021-08-25T04:44:05+5:30
महाबळेश्वर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ महाबळेश्वरात शिवसेना व ...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा महाबळेश्वर शिवसेनेकडून निषेध
महाबळेश्वर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ महाबळेश्वरात शिवसेना व युवासेनेच्यावतीने येथील मुख्य सुभाष चौकात निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला. सुभाष चौक ते पोलीस ठाणे असा मोर्चा काढून नारायण राणे मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. महाबळेश्वर पोलीस ठाण्यात सहा. पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्याकडे शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन वागदरे, शिवसेनेचे शहरप्रमुख राजा गुजर, तालुका संघटक विजय नायडू, तालुकाप्रमुख संतोष अप्पा जाधव, गणेश उतेकर, संजय शेलार, शिवसेना महिला आघाडीच्या राजश्री भिसे, वनिता जाधव, युवासेना शहरप्रमुख आकाश साळुंखे, राजेंद्र बोधले,चंद्रकांत पांचाळ, दीपक ताथवडेकर, चिंटू ढेबे, राजेंद्र पंडित, राजेंद्र सोंडकर, उस्मान खारकांडे, दिनेश पल्लोड, शाहनवाज खारकांडे आदी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.