शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावतांनी केली माढा लोकसभा मतदारसंघाची हवाई पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 11:07 IST

नसीर शिकलगार फलटण: रखडलेला निरा देवघर सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याच्या अनुषंगाने व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला मार्गी लावण्याच्या हेतूसाठी ...

नसीर शिकलगार

फलटण: रखडलेला निरा देवघर सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याच्या अनुषंगाने व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला मार्गी लावण्याच्या हेतूसाठी केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी हवाई पाहणी करावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्यानुसार  केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत  यांनी आज, सोमवारी पुण्यातून हेलिकॉप्टरने हवाई पाहणी केली.मंत्री शेखावत यांनी सकाळी हेलिकॉप्टर मधून फलटणसह माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी पट्ट्याची पाहणी सुरू केली. निरा देवघर सिंचन प्रकल्पाला नुकतीच सुमारे ३९०० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. विशेषतः फलटण व माळशिरस तालुक्याला याचा फायदा होणार आहे. म्हणूनच सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी खासदार नाईक-निंबाळकर यांनी केली आहे.  तर, अनेक वर्षे प्रलंबित असलेली व महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळी भागाला तारणहार ठरलेली कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना सध्या रखडलेली आहे. कृष्णा पाणी तंटा लवादच्या तांत्रिक अडचणींमुळे या योजनेला खो बसला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी मंत्री शेखावत यांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती खासदार नाईक-निंबाळकर यांनी केली आहे. त्या अनुषंगाने हवाई दौरा सुरू आहे. पंढरपूर येथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकचा तपशील मंत्री शेखावत देणार असल्याचे खा. नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर