अज्ञाताने जिल्हा परिषद शाळेतील झाडे तोडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:49+5:302021-07-20T04:26:49+5:30

आदर्की : आदर्की खुर्द (ता. फलटण) शाळेच्या खोल्याची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यासाठी जुनी झाडे काढून नवीन ३०-३५ शोभेची झाडे ...

Unidentified person cuts down trees in Zilla Parishad school! | अज्ञाताने जिल्हा परिषद शाळेतील झाडे तोडली!

अज्ञाताने जिल्हा परिषद शाळेतील झाडे तोडली!

आदर्की : आदर्की खुर्द (ता. फलटण) शाळेच्या खोल्याची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यासाठी जुनी झाडे काढून नवीन ३०-३५ शोभेची झाडे गत पंधरवड्यात लावली होती. ती अज्ञात व्यक्तीने कापून विद्रूपीकरण केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

आदर्की खुर्द, (ता. फलटण) येथील लोकवर्गणीतून बांधलेल्या शाळेच्या खोल्या होत्या; परंतु शाळेचा पट वाढल्याने गावाच्या बाहेर सतरा गुंठे जागेत पहिली ते सातवीचे वर्ग भरण्यासाठी वीस वर्षांपूर्वी पाच खोल्या बांधण्यात आल्या. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने संरक्षक भिंत बांधली. त्यावेळी शाळेच्या आवारातील खोल्यांमधून संगणक व टीव्ही संच गतवर्षी चोरीला गेला होता. त्यानंतर शाळेच्या सुशोभीकरणाचे काम सुरू झाले. त्यावेळी शाळेच्या आवारात असणारी बदाम, नारळ, आदी जंगली वृक्षांची झाडे होती. त्या झाडांच्या फांद्या छाटून कोवळे नारळ तोडून फेकून दिले होते. गतवर्षी संबंधित झाडे बांधकामाला व पेव्हर्स ब्लॉक, छत बांधण्यासाठी अडचण होती म्हणून काढून टाकण्यात आली. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वर्गखोल्यासमोर शिक्षकांनी सालपे येथील रोपवाटिकेतून विविध जातींच्या ३५ झाडे योग्यरितीने लावली होती; परंतु अज्ञात व्यक्तीने शाळेच्या आवारात प्रवेश करून पाम जातीची चार झाडे कापून टाकली आहेत तसेच विद्रुपीकरण केल्याने ग्रामस्थ व पालकांच्या संताप व्यक्त होत आहे.

कोेट..

गतवर्षी शाळेच्या खोलीतून संगणक व टीव्ही संच अज्ञात व्यक्तीने चोरून नेला होता तर शाळेच्या आवारातील नारळाच्या झाडावरील कोवळे नारळ तोडून फेकून दिले होते. त्यावेळी तोडणाऱ्यांची नावे समजली तसे ग्रामपंचायत प्रशासनाने कल्पना दिली होती. सालपे येथून शोभेची झाडे आणून लावली होती. ती रात्रीच्यावेळी अज्ञात व्यक्तीनी तोडल्याचे निदर्शनास आले.

-अशोक बोबडे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा आदर्की खुर्द

Web Title: Unidentified person cuts down trees in Zilla Parishad school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.