शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

gram panchayat election: सातारा जिल्हयात ४९ गावांमध्ये बिनविरोधचा डंका, २४२ गावांमध्ये धुमशान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 4:29 PM

आता गावोगावी प्रचाराचा धुरळा उडू लागला

सातारा : सातारा जिल्ह्यातील ३१९ पैकी ४९ गावांमध्ये बिनविरोधचा डंका वाजला आहे, तर २४२ गावांमध्ये धुमशान होणार आहे. २४२ सरपंच पदांसाठी ६५५ जण रिंगणात आहेत, तर १८१२ जागांसाठी ३८९७ जण रिंगणात आहेत. ८ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. अर्ज माघारीनंतर निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असून, आता गावोगावी प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे.सातारा तालुक्याात ३९ ग्रामपंचायतींपैकी दहा गावे बिनविरोध झाली असून, एकूण बारा सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. २६ सरपंच पदासाठी ६८, तर २०४ सदस्य पदांसाठी ४४७ जण रिंगणात आहेत. एका गावात सरपंच पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.कराड तालुक्यात ४४ पैकी ७ ग्रामपंचायती पूर्ण, तर चार अंशत: बिनविरोध झाल्या. चार ठिकाणी सरपंच पदाचा एकही अर्ज आला नाही. सरपंच पदाच्या २९ जागांसाठी ९०, तर २६७ सदस्य पदाच्या जागांसाठी ५१५ जण रिंगणात आहेत.पाटणमध्ये ८६ पैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ६५ गावांमध्ये निवडणुका होत आहेत. बिनविरोध सरपंच २० ठिकणी निवडून आले आहेत. त्यामुळे ६५ सरपंच पदासाठी १६१ जण, तर ४२६ सदस्य पदांसाठी ८८२ जण मैदानात उतरले आहेत.कोरेगावात ५१ पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर एक अंशत: बिनविरोध झाली. ४१ गावांमध्ये सरपंच पदासाठी १०० जण, तर २८७ सदस्य पदांसाठी ६०८ जण रिंगणात आहेत.वाईमध्ये सातपैकी एका ग्रामपंचायतीत सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित सहा सरपंच पदासाठी १९ तर ६६ सदस्य पदांसाठी १३३ जण मैदानात आहेत. खंडाळा येथे दोन ग्रामपंचायती असून, सरपंच पदासाठी १३, तर सदस्य पदांच्या २६ जागांसाठी ८६ जण रिंगणात आहेत.महाबळेश्वरमध्ये सहा ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ३८ ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले. आता तीन सरपंच पदांसाठी सहाजण, तर चार सदस्य पदासाठी आठजण रिंगणात आहेत. जावलीत १५ पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ११ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी २५, तर सदस्य पदासाठी ९० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.फलटणमध्ये २४ पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित २० ठिकाणी सरपंच पदासाठी ६९ जण, तर १८८ सदस्य पदासाठी ४१८ जण मैदानात उतरले आहेत.माण तालुक्यात ३० पैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर २७ गावांत सरपंच पदासाठी ७२, तर २१३ सदस्य पदांसाठी ४५८ जण रिंगणात आहेत. खटावमध्ये १५ पैकी दोन पूर्णत: तर एक ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली. आता १२ सरपंच पदासाठी ३२ जण, तर ८६ सदस्य पदांसाठी १७२ जण रिंगणात आहेत.

सरपंच पदाचे ६९, सदस्य पदाचे ८१२ सदस्य बिनविरोधजिल्ह्यात इच्छुकांनी शेवटपर्यंत अर्ज मागे न घेतल्यामुळे अनेक ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध न होता अंशत: बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यातील ६९ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत, तर ८२१ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये काही प्रभागांपुरती निवडणूक होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक