शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन योजना, वेतन मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचे छत्री आंदोलन, सातारा जिल्हा परिषदेवर मोर्चा 

By नितीन काळेल | Updated: July 15, 2024 15:49 IST

सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसही शासनाचे काम करत आहेत. त्यामुळे पेन्शन योजना लागू करावी, मानधनाएेवजी वेतन द्यावे यासह ...

सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसही शासनाचे काम करत आहेत. त्यामुळे पेन्शन योजना लागू करावी, मानधनाएेवजी वेतन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी सेविका-मदतनीसांनी जिल्हा परिषदेसमोर शेकडोच्या संख्येत छत्री आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका-सेविका संघाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मागील ३५ वर्षांपासून पेन्शन योजना सुरू करण्यासाठी आंदोलने करत आहेत. परंतु, अद्यापही कार्यवाही झालेली नाही. तसेच सेविकांना अनेक कामे देण्यात आली आहेत. ही सर्व कामे त्या करतात. त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा तसेच वेतन देण्यात यावे. शासन महागाई वाढीनुसार वारंवार शासकीय कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युएटी रकमेत वाढ करते. परंतु, सेविका आणि मदतनीसांच्या ग्रॅच्युएटी रकमेत वाढ करत नाही. याबाबतच विचार व्हावा. सेविका या अर्धवेळ कर्मचारी असून शासन पूर्णवेळ काम देत आहे. त्यामुळे शासनाने सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षिका म्हणून घोषित करावे. शासन नवी योजना लागू करते तेव्हा सेविकांनाच काम व मोबदला दिला जातो. तरीही सेविका आणि मदतनीस या दोघींचाही विचार करुन त्यांना आऱ्थिक लाभ वितरित करावा, कोरोना काळातील २१ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता लाभ तातडीने द्यावा, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.आंदोलन अॅड. नदीम पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यामध्ये संघटनेच्या राज्य अध्यक्षा सुजाता रणनवरे, जिल्हाध्यक्षा अर्चना अहिरे, संघटक संदीप माने, विठ्ठल सुळे यांच्यासह शेकडोच्या संख्येत सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदagitationआंदोलन