जिल्ह्यात उकाडा जाणवू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:08+5:302021-02-05T09:10:08+5:30
सातारा : जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी झाले असून कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, ...

जिल्ह्यात उकाडा जाणवू लागला
सातारा : जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी झाले असून कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, रविवारी साताऱ्यातील कमाल तापमान ३३ अंशापर्यंत तापमान गेले होते.
जिल्ह्यात थंडीला वेळेवर सुरुवात झाली असलीतरी प्रमाण कमी आहे. मागील महिन्यात दोन वर्षातील नीच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. पण, काही दिवसच थंडी अनुभवायास मिळाली. सध्या थंडी गायब आहे. किमान तापमान १५ अंशावर कायम आहे. तर काहीवेळा हेच तापमान २१ अंशापर्यंत पोहोचले आहे. असे असतानाच जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. २२ जानेवारीला ३२.६, दि. २३ ला ३३.१ तर रविवारी ३२.९ अंश तापमानाची नोंद झाली. परिणामी तापमान वाढल्याने जिल्ह्यात उकाडा जाणवत आहे.
...............................................