शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

अवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 18:41 IST

अवकाळी पावसामुळे राज्यात मोजदाद न करता येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांबरोबर आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्देअवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरेखटाव तालुक्यातील पिकांची पाहणी

मायणी : अवकाळी पावसामुळे राज्यात मोजदाद न करता येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांबरोबर आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.खटाव तालुक्यातील मायणी, कातरखटाव येते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी ते शुक्रवारी तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. दुपारी तीन वाजता त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. त्यानंतर येथील बागायतदार शिवाजी शामराव देशमुख यांच्या द्र्राक्षबागेची पाहणी केली. त्यांच्याबरोबर खासदार अरविंद सावंत, नितीन बानुगडे-पाटील, आमदार महेश शिंदे, शेखर गोरे यांच्यासह जिल्हा व राज्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, ह्यसरकार स्थापन होईल न होईल, याचे मला काही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द निवडणुकीदरम्यान दिला आहे, तो पूर्ण करणारच आहे. मी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येथे आलो आहे. यापूर्वी मी विदर्भ, मराठवाडा भागांमध्ये अवकाळीने झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे. प्रत्येक भागात वेगवेगळी पिके घेतली जातात. त्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करत नाही, तोपर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. त्यांच्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे.यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस पाटील प्रशांत कोळी यांच्यासह महसूल, कृषी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.प्रत्येक भागात मदत केंद्रप्रत्येक भागातील शेतकऱ्यांची समस्या वेगळी असल्याने आम्ही प्रत्येक भागात मदत केंद्र उभे करणार आहे. याठिकाणी येऊन शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडव्यात, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.विमा कंपनीकडूनही फसवणूकअवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेले असतानाच विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. खासगी विमा कंपनीकडूनही या भागातील ग्रामस्थांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSatara areaसातारा परिसर