शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी; शिवेंद्रसिंहराजेंची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 21:52 IST

Shivendra Raje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे गृहनिर्माण व नगर मंत्रालयात मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन कास बंदिस्त जलवाहिनी व त्याच्याशी निगडित कामांना निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन दिले.

सातारा : ‘पालिकेची निवडणूक जवळ आल्याने खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्लीत निवेदने देऊन फोटोसेशन करण्याची नौटंकी सुरू झाली आहे. विकासाची खोटी स्वप्ने दाखविण्याचे दिवस आता संपले असून, सातारकरांना जाब देण्याची वेळ आली आहे, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे गृहनिर्माण व नगर मंत्रालयात मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन कास बंदिस्त जलवाहिनी व त्याच्याशी निगडित कामांना निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन दिले. उदयनराजेंच्या या दिल्ली निवेदनावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रक काढून जोरदार टीका केली आहे. या पत्रकात म्हटले आहे की, पालिका निवडणूक आली की मंजूर नसलेल्या, न होणाऱ्या आणि दुसऱ्याने केलेल्या कामांचे नारळ फोडायचे. 

मुंबई, दिल्लीवारी करून मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदन द्यायचे आणि फोटोसेशन करून सातारकरांना भुलवायचे हे प्रकार जोमाने सुरू झाले आहेत. वास्तविक कास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू झाल्यानंतर पालिकेने वाढीव जलवाहिनीचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, सातारकरांशी काहीही देणेघेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना फक्त पैसा आणि पैसा याशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते.

सातारा पालिकेला अक्षरश: लुटणारे आता निवडणूक आली की, निवेदन आणि फोटोसेशन करून विकासाची खोटी स्वप्ने रंगवत आहेत. ज्यावेळी निधीअभावी कास प्रकल्पाचे काम थांबले होते, त्यावेळीच वाढीव जलवाहिनीचा प्रस्ताव शासनाकडे सादर व्हायला हवा होता. पण, त्यावेळी यांना कशाचेच काहीही देणेघेणे नव्हते. हे आणि प्रशासन झोपा काढत होते. ज्यात पैसे आहेत त्यातच यांना रस असतो, हे सातारकरांना केव्हाच कळून चुकले आहे.

तुमच्या पापाचा घडा भरला...पाईपलाईनचे काम मंजूर व्हायला वर्ष लागणार, त्यानंतर काम सुरू होणार आणि पूर्ण कधी होणार? तोपर्यंत सातारकरांना कासच्या पाण्याचे स्वप्न फक्त बघतच बसावे लागणार आहे. धरणाची उंची वाढली, पाणीसाठाही वाढला पण सातारकरांना वाढीव पाणी मात्र मिळणार नाही हे पाप तुम्ही केले. आता तुमच्या पापाचा घडा भरला असून, सुज्ञ सातारकर तुम्हाला चांगला धडा शिकवतील, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला आहे. 

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसरPoliticsराजकारण