शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा नगरपालिकेत उदयनराजेंचे धक्कातंत्र; दत्ता बनकर उपनगराध्यक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 14:47 IST

पाचजणांना ‘स्वीकृत’ची लॉटरी

सातारा : सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाबाबत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर गुरुवारी पडदा पडला. खासदार उदयनराजे भोसले यांनी ऐनवेळी ॲड. दत्तात्रय बनकर यांचे नाव पुढे करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बनकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केली.सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारी सकाळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सभा सचिव वर्षा पाटील यांनी उपनगराध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. यानंतर निवड प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळी ११ ते १२ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतः उपस्थित राहून उपनगराध्यक्ष पदासाठी ॲड. बनकर यांचा अर्ज मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे दाखल केला. या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली.उदयनराजेंच्या या 'गुगली'मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, दत्ता बनकर यांच्या निवडीने सातारा विकास आघाडीत नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी पालिकेचे गटनेते अविनाश कदम, पक्षप्रतोद निशांत पाटील, नगरसेवक धनंजय जांभळे, प्रशांत आहेरराव, नगरसेविका मुक्ता लेवे, आशा पंडित, राजू गोरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

स्वीकृत सदस्यपदी दिग्गजांची वर्णीउपनगराध्यक्ष निवडीसोबतच पाच स्वीकृत नगरसेवकांची प्रक्रियाही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये दोन्ही राजेंच्या समर्थकांना संधी देण्यात आली. उदयनराजे गटाकडून पंकज चव्हाण आणि माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, तर शिवेंद्रसिंहराजे गटाकडून रवी पवार, सुनील भंडारी आणि रीना भणगे यांना स्वीकृतची लॉटरी लागली. या पाचही अर्जांची छाननी वैध ठरल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

नूतन नगरसेवकांना 'कायद्याची' भेटनिवडीनंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या हस्ते सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाची सखोल माहिती व्हावी, यासाठी 'महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५' हे कायद्याचे पुस्तक भेट देण्यात आले.

कार्यकर्त्यांकडून जल्लोषया निवडी पार पडल्यानंतर नूतन उपनगराध्यक्षांना नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी त्यांच्या दालनात आदरपूर्वक स्थानापन्न केले. या ठिकाणी ॲडव्होकेट दत्ता बनकर यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली. बनकर यांच्या समर्थकांकडून कार्यालयातच गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Udayanraje's surprise move: Datta Bankar elected Satara Deputy Mayor!

Web Summary : Udayanraje Bhosale surprised everyone by nominating Adv. Datta Bankar as Deputy Mayor of Satara. Bankar was elected unopposed. Additionally, five members were appointed, and new councilors received legal handbooks.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले