उदयनराजेंनी फडकावला ‘लोकमत’चा अंक

By Admin | Updated: August 27, 2014 23:28 IST2014-08-27T22:11:54+5:302014-08-27T23:28:45+5:30

गोडोली पूर : मंत्र्यांशी चर्चा; ओढे संकुचित करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Udayanrajeni Phadkavala's 'Lokmat' score | उदयनराजेंनी फडकावला ‘लोकमत’चा अंक

उदयनराजेंनी फडकावला ‘लोकमत’चा अंक

सातारा - गोडोली परिसरातील ओढ्यांचे नैसर्गिक स्त्रोत, अतिक्रमणे करून संकुचित करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच पूरस्थिती मानवनिर्मित आहे का? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि वने, पुनर्वसन आणि आपत्ती निवारण मंत्री पतंगराव कदम यांना समक्ष भेटून निवेदनाव्दारे केली आहे. पुराची भीषणता दाखविण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी ‘लोकमत’चा अंक दाखवला.
सातारा जिल्ह्यात ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस पडला. ढगफुटीमुळे कोट्यवधींचे वित्तीय नुकसान नागरिक व व्यावसायिकांचे झाले आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने आर्थिक मदत शासनाकडून मिळावी, सातारा शहरातील विशेष करून गोडोली परिसरात मोठे नुकसान झाले आहे. दि. २० आॅगस्ट रोजी दीड तासात सुमारे ८२ मिलीमीटर इतका मोठ्या पावसाची नोंद झाली. तर दि. २१ आॅगस्ट रोजी ७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
या ढगफुटीमुळे सातारकरांचे अतोनात नुकसान झाले. कुणाचे कौटुंबिक साहित्य वाहून गेले. घरे व घरांच्या भिंतींची पडझड झाली, कुणाच्या वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी जाऊन वाहने कायमस्वरूपी नादुरुस्त झाली आहेत. डोंगर उतारावरून येणाऱ्या गोडोली परिसरातील ओढ्यांवर बेकायदेशीर अतिक्रमणे करून ओढ्यांची नैसर्गिक रुंदी कमी केल्याने आणि नैसर्गिक स्त्रोत कृत्रिमरीत्या लहान व्यासाच्या पाईपलाइन टाकून बंदिस्त केले गेल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन, नागरिकांना अत्यंत बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे.पूरपरिस्थितीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. याप्रकरणी नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत आपत्ती निवारणाखाली देण्यात यावी. सातारा शहरातील विशेष करून गोडोली परिसरातील ओढ्यांचे नैसर्गिक स्त्रोत, अतिक्रमणे करून संकुचित करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच पूरपरिस्थिती मानवनिर्मित आहे कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. (प्रतिनिधी)

‘लोकमत’चा आधार
गोडोली येथे घडलेल्या महापुराच्या प्रकाराविषयी ‘लोकमत’ने सविस्तर वार्तांकन केले होते. ‘लोकमत’मध्ये आलेल्या या वृत्ताचे अंक घेवून उदयनराजे यांनी मंत्री पंतगराव कदम आणि बाळासाहेब थोरात यांना वास्तव दाखविले. यावेळी विलास आंबेकर व सागर राजेमहाडिक उपस्थित होते.

मुंबई येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व वनमंत्री पतंगराव कदम यांना मागण्यांचे निवेदन सादर करताना खा. उदयनराजे भोसले. यावेळी सागर राजेमहाडिक, मंत्री बाळासाहेब थोरात व विलास आंबेकर उपस्थित होते. पुराची भीषणता दाखविण्यासाठी यावेळी ‘लोकमत’चा अंक दाखवला गेला.

Web Title: Udayanrajeni Phadkavala's 'Lokmat' score

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.