शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सातारा लोकसभा मतदारसंघात वाढला टक्का; कुणाला धक्का

By नितीन काळेल | Updated: May 8, 2024 19:02 IST

तीन टक्क्यांनी वाढले मतदान; भाजप-राष्ट्रवादीत मंथन 

सातारा : मतदान वाढीसाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य केल्याने सातारा लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीपेक्षा सुमारे तीन टक्क्यांनी मतदान वाढले. त्यामुळे ६३ टक्क्यांवर मतदान झाल्याने हा वाढता टक्का कोणाला धक्का अन् कोणाला हात देणार, याबाबत मंथन सुरू झाले आहे. तरीही भाजप आणि राष्ट्रवादीने आम्हीच विजयी होण्याचा दावा ठोकला आहे.सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सुमारे १९ लाख मतदार निवडणुकीसाठी पात्र होते. त्यातील ६३ टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. तरीही अंतिम आकडेवारी आल्यानंतर मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज आहे. त्यातच मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचे प्रमाण वाढले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांत जागृती केली. याचा परिणाम मतदान वाढीत झाला आहे. पण मतदानाची ही वाढती टक्केवारी काहींना डोकेदुखी ठरू शकते. याचे अनुमान आताच बांधणे अवघड असले तरी प्रमुख राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत.सातारा मतदारसंघात एकूण १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही नशीब अजमावले. तरीही खरी लढत ही भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यातच झाली. या दोघांनी मतदारसंघात प्रचाराचे रान उठवले होते. तसेच या दोघांसाठी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील नेत्यांनी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे मतदारसंघात चुरस निर्माण झालेली.मतदान झाले असलेतरी मतमोजणीनंतरच वाढत्या मतदानाने कोणाला आधार दिला हे स्पष्ट होणार आहे. पण तोपर्यंत विचारमंथन होत राहणार आहे. तरीही संपूर्ण मतदारसंघात निवडणूक चुरशीची झाली. कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, वाई, कोरेगाव या विधानसभा मतदारसंघांत भाजप आणि राष्ट्रवादी उमेदवारांत मते मिळविण्यावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या निवडणुकीचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे. यासाठी ४ जूनचीच वाट पाहावी लागणार आहे.

पोटनिवडणुकीतील वाढीव मतदानाचा राष्ट्रवादीला फायदा..२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार उदयनराजे भोसले हे निवडून आले होते. त्यानंतर उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली. ही निवडणूक विधानसभेबरोबरच झाल्याने चुरस होती. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी ६७ टक्के मतदान झाले होते. या वाढीव मतदानात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या विजयाचे गणित होते.

३ टक्के मतदानाच करणार फैसला..१९९१ पासून आतापर्यंत लोकसभेसाठी आठ सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यामध्ये सर्वात कमी मतदान २००९ च्या निवडणुकीत ५२.८ टक्के झाले होते, तर १९९९ च्या निवडणुकीत ७१.४१ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१९ च्या निवडणुकीत ६०.४७, तर आता ६३ टक्क्यांवर मतदान झाले आहे. हे वाढीव ३ टक्के मतदानच मतदारसंघाचा फैसला करणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४VotingमतदानUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShashikant Shindeशशिकांत शिंदे