शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Udayanraje bhosle : हात जोडून विनंती करतो, माझी जिरवायची तर जीरवा; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 17:31 IST

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटपाप्रकरणी बँकेला ईडीने नोटीस धाडली आहे. या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे माहिती मागितली होती

ठळक मुद्देबँक टिकवली, टिकून राहवी म्हणून मला राहवं लागणार. इकडच्य लोकांना तुम्ही बोलून घ्या, जिरवू... माझी नका जीरवू. मेहरबानी करा, मी तुमचा कोणाचा दुश्मन नाही.

सातारा - जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांना टार्गेट करताना मी जे काही करतोय ते शेतकरी आणि सभासदांसाठीच करतोय, असे म्हणत उदनयनराजेंनी हात जोडून विनंती करत असल्याचं म्हटलं. एकवेळ माझी जिरवायचीय तर जीरवा, पण सभासदांची जीरवू नका, ही बँक शेतकऱ्यांची अन् सभासदांची आहे, असेही उदयनराजेंनी म्हटलं. 

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटपाप्रकरणी बँकेला ईडीने नोटीस धाडली आहे. या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे माहिती मागितली होती. मात्र, बँकेच्या संचालकांनी ही माहिती उदयनराजेंना देण्यास देण्यास नकार दिला. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले भडकले आणि त्यांनी ही बँक बँकच राहूद्या, गोरगरिबांची ती अर्थवाहिनी आहे, असे म्हणत सत्ताधारी पॅनेलवर चांगलाच प्रहार केला. 

बँक टिकवली, टिकून राहवी म्हणून मला राहवं लागणार. इकडच्य लोकांना तुम्ही बोलून घ्या, जिरवू... माझी नका जीरवू. मेहरबानी करा, मी तुमचा कोणाचा दुश्मन नाही. मी हात जोडून विनंती करतो, ही बँक शेतकरी अन् सभासदांची आहे, त्या बिचाऱ्या शेतकरी वर्गाच्या गोरगरीब सभासदांच्यावतीने विनंती करतो, ती बँक राहू द्या, संपूर्ण अर्थवाहिनी आहे. माझी जीरवायची असेल तर जीरवा, पण सभासदांची जिरवू नका. 

माझा काय स्वार्थ

मी जे करतोय त्याला तुम्ही म्हणता तडजोड करतोय, त्यात माझा काय स्वार्थ आहे. कुठं जायचं ते मी ठरवतो, पॅनलमध्ये घेणार सांगणारे हे कोण. परिणामाला मी घाबरत नसतो, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही, संबंधितांनी समजून घ्यावं, बोध घ्यावा, मी केवळ शेतकऱ्यांच्या हिताचं बोलतोय, असे उदयनराजे यांनी म्हटलंय.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसरbankबँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय