शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Politics: उदयनराजे दिल्लीत; दोन्ही पाटील यांचा प्रचार गल्लीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 12:08 IST

खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांचा मतदारसंघात प्रचार सुरू

सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. तर खासदार श्रीनिवास पाटील आणि आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे एका बाजूला उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दोन्ही पाटील प्रचाराला लागले आहेत. कऱ्हाड आणि वाई महाबळेश्वर या मतदारसंघात प्रचाराच्या थाटात सभा सुरू झाल्या असून मतदारांना शब्दाला जागल्याची आठवण करून दिली जात आहे.सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाआघाडी या दोन्ही आघाड्यांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. या मतदारसंघातून भाजपला उमेदवारी मिळावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला या मतदारसंघावर हक्कच असल्याने आपल्या वाट्याला मतदारसंघ यावा अशी भूमिका घेतली आहे. महायुतीतील हे दोन्ही पक्ष आपल्या मतावर ठाम असल्याने उमेदवार ठरविण्यास वेळ लागत आहे. भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत ठाण मांडले आहेत. त्यांना उमेदवारी मिळणार याबाबत निश्चिंतता असली तरीदेखील भाजप ही राष्ट्रवादीची मनधरणी कशाप्रकारे करते यावर बरेच अवलंबून आहे.

सातारा आणि माढा मतदारसंघातील उमेदवारीबाबत दोन्ही आघाड्यांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघ सध्या नाराजीच्या गर्तेतून जात आहेत. एका ठिकाणी उमेदवार दिल्यानंतर भाजपला होणारा विरोध तर दुसरीकडे उमेदवार न दिल्याने भाजपबाबत असलेली नाराजी अशी दोन्ही अडचणीतून भाजपची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात सध्या क्रमांक एकची ताकद निर्माण केलेली असतानादेखील भाजपला उमेदवारी देताना चाचपडत बसावे लागत आहे.

उमेदवारांची तयारी जागेची अडचणराष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार या दोघांकडेही उमेदवार तयार आहेत. महायुतीतून जागेसाठीचा हिरवा कंदील अजित पवार यांना मिळालेला नाही. तर महायुती कोण उमेदवार देते यावर महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष उमेदवार देणार आहेत. त्यामुळे एकमेकांच्या राजकारणावर उमेदवारी अवलंबून असल्याने प्रत्येकजण दुसऱ्याचा उमेदवार जाहीर करण्याची वाट पाहत आहे.

जागा सुटली, पण पक्षाअंतर्गत विरोधमहाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सातारा लोकसभा मतदारसंघ असला तरी याठिकाणी खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यास पक्षातीलच लोकांनी विरोध केला आहे. त्यामुळे त्यांचाही अंदाज पक्ष नेतृत्वाकडून घेतला जात आहे. तरीदेखील खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तसे त्यांनी गेली पाच वर्षे पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे त्यांना नव्याने वेगळा प्रचार करण्यासाठी फार त्रास घ्यावा लागणार नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणShrinivas Patilश्रीनिवास पाटील