उदयनराजे भोसले यांचे चिलेवाडीत श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:01 IST2019-04-09T23:00:58+5:302019-04-09T23:01:03+5:30
सातारा : जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेचे काम प्रेरणादायी ठरले असून अधिकारी, पदाधिकारी, नेतेमंडळीही गावोगावी जात श्रमदान करत आहेत. अशाचप्रकारे ...

उदयनराजे भोसले यांचे चिलेवाडीत श्रमदान
सातारा : जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेचे काम प्रेरणादायी ठरले असून अधिकारी, पदाधिकारी, नेतेमंडळीही गावोगावी जात श्रमदान करत आहेत. अशाचप्रकारे मंगळवारी सकाळी सातारा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी चिलेवाडी गावास भेट देत श्रमदान केले. यामुळे ग्रामस्थांचा उत्साह वाढला.
कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी गाव. या गावातील वॉटर कपच्या कामास उदयनराजेंनी भेट दिली. यावेळी उदयनराजेंनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले. भावी आयुष्य समृद्ध व्हायचे असेल तर वृक्षतोडीस प्रतिबंध, पाणी बचत आणि वृक्ष लागवड ही त्रिसूत्री अंमलात आणावी लागेल, असे सांगितले. दुष्काळ हटविण्यासाठी ग्रामस्थांनी एकदिलाने काम करुन जलसंधारणाची कामे करावीत.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ, पाणी फाउंडेशनचे समन्वयक बाळासाहेब शिंदे, चिलेवाडीच्या उपसरपंच मंगल जाधव, काका धुमाळ, धर्मराज जगदाळे, राहुल बासल, अमर ढोले, सागर ढोले, किरण शेडगे, चेतन ढोले, संदीप पवार, राजेंद्र घोरपडे, श्रीकांत फाळके, लता ढोले, सतीश साळुंखे व चिलेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.