शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

Satara LokSabha Constituency: आघाडी एकसंध; महायुतीत घुसमट! 

By नितीन काळेल | Updated: April 9, 2024 19:26 IST

उदयनराजे-शशिकांत शिंदे यांच्यातच लढतीचे संकेत

सातारा : साताऱ्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले असून, भाजपकडे मतदारसंघ राहिल्यास खासदार उदयनराजेच रिंगणात राहणार आहेत. यामुळे शिंदे आणि उदयनराजेंतच लढत होण्याचे संकेत आहेत. त्यातच सध्या आघाडी एकसंध असताना महायुतीतील घुसमट समोर येऊ लागली आहे.राज्यात मागील पावणे दोन वर्षात राजकीय उलथापालथी मोठ्या प्रमाणात झाल्या. त्याचे पडसाद आणि परिणाम जिल्ह्या-जिल्ह्यात दिसून येत आहेत. त्यामुळेच आताच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ मिळविणे आणि उमेदवार ठरविण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचाही अपवाद नाही. कारण, २००९ पासून २०१९ पर्यंतच्या तीन निवडणुका पाहता निवडणूक आणि उमेदवारांची मोठी चर्चाच झाली नाही. पण, आताची निवडणूक ही चर्चा, रस्सीखेच, धुसफूस, नाराजी घेऊन आली आहे. त्यामुळेच अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. यापेक्षा मतदारसंघ कोणाकडे जाणार यावरूनच पेच सुरू आहे.सातारा मतदारसंघ पूर्वी युतीत शिवसेनेकडे होता. आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातच मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू आहे. भाजपला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी मतदारसंघ हवा आहे, तर अजित पवार गटाला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी मतदारसंघातून उमेदवार उतरावयाचा आहे. पण, दोघेही माघार घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभेची एक जागा देण्याचा शब्दही भाजपने अजित पवार गटाला दिला असल्याची माहिती समोर आली आहे. पण, यावरही राष्ट्रवादी खूश दिसत नाही. त्यामुळे हा तिढा सुटलेला नाही. हा मतदारसंघ भाजपला न मिळाल्यासही उदयनराजे हे पुन्हा रिंगणात असणार आहेत. त्यामुळे महायुतीचेच गणित फसू शकते.महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. शरद पवार यांनी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आलेली आहे. यासाठी १५ एप्रिलला अर्जही भरला जाणार आहे. राष्ट्रवादीने आक्रमक चेहऱ्याचा उमेदवार दिल्याने साताऱ्याची लढत बिग फाईट होण्याचे संकेत आहेत.

महायुतीत सुंदोपसुंदी; डोकेदुखी वाढणार ?निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पहिल्यापासून एकसंध दिसली. आतापर्यंत मेळावे, बैठका झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उध्दवसेना तसेच इंडिया आघाडीतील नेतेही सोबत होते. पण, महायुतीत सुंदोपसुंदी दिसत आहे. कारण, अजित पवार गटाला मतदारसंघ हवा आहे. त्यातच आतापर्यंतच्या मेळाव्यात आमदार मकरंद पाटील यांची अनुपस्थिती दिसली. तर ‘रिपाइं’चा आठवले गट सन्मान मिळत नाही म्हणून वेगळ्या भूमिकेत आहे. त्यामुळे ही नाराजी कायम राहिली तर महायुतीत डोकेदुखी वाढू शकते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShashikant Shindeशशिकांत शिंदे