शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते, शिवेंद्रसिंहराजेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 18:28 IST

‘निवडणूक आली की शरद पवारांना जवळ करायचं. भाजपाच्या मंत्र्यांना भेटायचं, असं लक्षण हे स्वार्थीपणाचं असतं. म्हणूनच खासदार उदयनराजे हे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते आहेत,’ असा पलटवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.

सातारा : ‘निवडणूक आली की शरद पवारांना जवळ करायचं. भाजपाच्या मंत्र्यांना भेटायचं, असं लक्षण हे स्वार्थीपणाचं असतं. म्हणूनच खासदार उदयनराजे हे जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेते आहेत,’ असा पलटवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर सडकून टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी शनिवारी दुपारी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.पत्रकार परिषदेत आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे आगमन झाल्यानंतर त्यांनी खुर्चीवर बसण्यापूर्वीच शर्टचे कॉलर उभे केले. मिश्कीलपणे हसून आम्हीही आता काही कमी नाही, हे त्यांनी दाखवून दिले. सातारा पालिकेत भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप करतच आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंच्या सोबत असलेल्या मटकावाल्यांचा समाचार घेतला. उदयनराजेंच्या गाडीमध्ये मटकेवाले आणि खंडणीखोर फिरत असतात. हे कोणाला दिसत नाही. त्यांच्याजवळ नेहमी असणारा अशोक सावंत याचे आणि साता-याचे काय संबंध आहेत. त्याला एवढा साता-याचा पुळका कशासाठी, कुठलेही काम असो, अशोक सावंत तेथे असतोच, तडजोड करून नेत्यांपर्यंत पोहोच करण्यासाठीच तो नेत्यांसोबत असतो, अशी चर्चा आहे. जिल्ह्यातील, शिरवळ, लोणंद, वाई आणि सातारा या एमआयडीसीमध्ये चांगले कारखाने आले नाहीत, याला सर्वस्वी उदयनराजे आणि त्यांची दशहत जबाबदार आहे. अजिंक्यतारा बँकेचे विलिनीकरण होऊ नये म्हणून उदयनराजेंकडूनच दबाव आणला जात होता. दमदाटी, शिवीगाळ असे अनेक प्रकार त्यांनी केले. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. शेवटी बँकेचे विलिनीकरण झाले. आम्ही एकाही ठेवीदाराचे पैसे बुडविले नाहीत. तुमच्या पोटात एक आणि ओठात एक असते.पोवई नाक्यावर उड्डाणपूल होणार होता. मात्र, या ठिकाणी उड्डाणपूल बसत नसल्यामुळे शेवटी ग्रेड सेपरेटरचा निर्णय घेण्यात आला. हे काम छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असतानाच प्रस्तावित होता. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे काम मार्गी लावले. उदयनराजेंचा संबंध केवळ नारळ फोडण्यापुरताच आहे, अशी टीकाही आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केली.  

मी खलनायक तर तुम्ही प्रेम चोप्रा...खासदार उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे खलनायक असल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘मी खलनायक आहे, ठीक आहे; पण तुम्ही बिनदाढीचे प्रेम चोप्रा आहात. मी सारखं अमोल पालेकरच्या भूमिकेत राहणार नाही, असाही टोला शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंना लगावला.

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर