उदयनराजेंना होणार अटक? ‘मुदती"चा अर्जही फेटाळला
By Admin | Updated: April 13, 2017 21:07 IST2017-04-13T21:07:25+5:302017-04-13T21:07:25+5:30
अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत द्यावी, असा खासदार उदयनराजेंनी केलेला अर्जही गुरुवारी न्यायालयाने फेटाळून लावला

उदयनराजेंना होणार अटक? ‘मुदती"चा अर्जही फेटाळला
>आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 13 - अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत द्यावी, असा खासदार उदयनराजेंनी केलेला अर्जही गुरुवारी न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे खंडणी आणि हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यात उदयनराजेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
लोणंद येथील सोना अलाइज कंपनीच्या मालकाला खंडणी मागून ती न दिल्याने त्यांना जबर मारहाण केल्याच्या आरोपावरून खासदार उदयनराजे यांच्यासह शहर पोलीस ठाण्यात 15 जणांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणामध्ये बुधवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी उदयनराजे यांचा अंतरिम जामीन फेटाळला होता. त्यामुळे उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी उदयनराजेंच्या हालचाली सुरू झाल्या. उच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत द्यावी, असा अर्ज खासदार उदयनराजे यांच्या वतीने गुरुवारी न्यायालयात करण्यात आला. यावेळी न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईल संवादमध्ये सहभाग स्पष्ट होत असल्याने मुदतीचा अर्जही फेटाळत असल्याचा आदेश दिला. त्यामुळे खासदार उदयनराजेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.