Udayan Raje will remain in NCP | उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार
उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजप प्रवेश सोडून इतर विषयांवर चर्चा केली. आपले संबंध चांगले रहावेत या उद्देशाने ही भेट घेण्यात आली असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबवण्याचा निर्णय असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाली; दरम्यान, उदयनराजेंनी भाजपसमोर काही अटी घातल्याची जी चर्चा सुरू होती, ती चुकीची असल्याची माहितीही त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी दिली. पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश आणि विधानसभेबरोबर लोकसभेची पोटनिवडणूक अशा अटी होत्या. असे म्हटले जात होते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन अनेकजण भाजपच्या तंबूत जाऊन बसले आहेत. १३ सप्टेंबर रोजी मुंबईत आणखी काही प्रवेश होणार असल्याचीही चर्चा आहे. या प्रवेशांमध्येच उदयनराजेंचाही भाजप प्रवेश होईल, अशी शक्यता होती; परंतु आता हा प्रवेश थांबला आहे.

Web Title: Udayan Raje will remain in NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.