दोन खटल्यांतून उदयनराजे निर्दोष

By Admin | Updated: October 30, 2015 23:30 IST2015-10-30T23:25:44+5:302015-10-30T23:30:32+5:30

न्यायालयाचा निकाल : मारहाण, अ‍ॅट्रॉसिटीच्या घटनांचा समावेश

Udayan Raje is innocent from two cases | दोन खटल्यांतून उदयनराजे निर्दोष

दोन खटल्यांतून उदयनराजे निर्दोष

सातारा : मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या दोन विविध आरोपांतून खासदार उदयनराजे भोसले व इतरांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यातील एक खटला २००४ मधील असून, दुसरी घटना २००७ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी घडली होती.
२००७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी आमदार शशिकांत शिंदे यांचे स्वीय सहायक प्रदीप शिंदे यांना उदयनराजे भोसले, आसिफ शेख, पिनू चव्हाण, सचिन राजेशिर्के, सुशील मोझर, नरेंद्र बेलोशे यांनी मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या खटल्यामध्ये न्यायालयाने खासदार उदयनराजेंसह वरील सहाजणांची निर्दोष मुक्तता केली.
दुसरी घटना दि. ११ डिसेंबर २००४ रोजी घडली होती. संतोष कांबळे, संजय कांबळे या दोघा भावांना मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप उदयनराजे भोसले, नासिर शेख, तत्कालीन उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण सोनवणे, अमरसिंह इंगळे व अन्य एकावर होता. या खटल्यातूनही उदयनराजेंसह वरील सहाजणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या दोन्ही खटल्यांत बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. ताहेर मणेर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Udayan Raje is innocent from two cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.