शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : 'मी काय बांगड्या भरल्या नाहीत', टीकाकारांना उदयनराजेंनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 16:07 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : साताऱ्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेंना आज पवारांचं नाव घेताना अश्रू अनावर झाले होते.

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले आता पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. विधानसभा निवडणुकांसोबतचसातारा लोकसभेचीही पोटनिवडणूक होईल. तर, 24 ऑक्टोबरला या जागेसाठी मतमोजणी होणार असल्याने उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे. मात्र, जर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच निवडणुकीच्या मैदानात उतरणार असतील, तर मी निवडणुकीतून माघार घेईल, असे उदयनराजेंनी म्हटले. यावेळी, बोलताना उदयनराजे भावुक झाले होते. उदयनराजेंना आदराची भावना व्यक्त करत, टीका करणाऱ्यांनाही धारेवर घेतले.  

साताऱ्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसलेंना आज पवारांचं नाव घेताना अश्रू अनावर झाले होते. आज महाळ आहेत, अस सांगताना पवारसाहेब मला पितृतुल्य असल्याचं ते म्हणाले. तसेच, मी लोकशाही मानणारा आहे, माझ्यावर अनेकांनी तोंडसुख घेतलं, काहीही बोलायचंय ते बोलले. मी उगीच इकडं तिकडं गेलो नाही. हसू का रडू तेच मला कळत नाही. आपण एकमेकांचा हात धरू शकतो, पण.... त्यांना योग्य वाटलं ते ते बोलले. मानसिक समाधान झालं असेल, नसेल तर अजून बोला. कुणी काय केलं, याचा लेखाजोखा लोकांपुढ मांडतो. मी आतापर्यंत समाजकारण केलं, राजकारण कधीही केलं नाही. 

मी आदराने बोलतो, खूप आदर आहे मला त्यांचा. नवाब मलिक हेही बोलले. त्यांच्याबद्दलही आदर आहे. पण, कधीतरी अंतर्मनात झाकून बघा. मी स्वाभिमान सोडलेला नाही, कुणीपण कायपण बोलायचं. मी ऐकून घ्यायचं. एवढ्या काय मी बांगड्या भरल्या नाहीत. हिंमत असेल तर चॅलेंज घ्या, कुणीपण या समोरासमोर बसा ! असे म्हणत उदयनराजेंनी टीकाकारांचा समावेश घेतला. 

कॉलर उडवण्याच्या संदर्भातील व्यक्तव्यावरुनही त्यांनी शिवसेनेला नाव न घेता टोला लगावला. ''मला गाणे आवडते मी लावतो, कॉलर माझीय, चावीन नाहीतर फाडून टाकीन. दुसऱ्याला काय, त्याच्यावरही चर्चा. इश्यूबेस राजकारण करू नका, इश्यूबेस समाजकारण करा'', असे म्हणत सामनातील अग्रलेखावरुन शिवसेनेला टोला लगावला.  

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेsatara-pcसाताराSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019