शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या राजकारणात वृषालीराजे भोसलेंची एंन्ट्री?,

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 17:25 IST

सातारा : सातारचे राजकारण खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांच्याच भोवती फिरत आले आहे. या दोघांमधील ...

सातारा : सातारचे राजकारण खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांच्याच भोवती फिरत आले आहे. या दोघांमधील वाक्ययुद्धाने ते नेहमी चर्चेत असतात. निवडणूक ज‌वळ आली की या दोघा राजेंमध्ये कलगीतुरा रंगतो. आता यात आणखीन एका राजघराण्यातील सदस्याची भर पडणार आहे. माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांच्या कन्या वृषालीराजे भोसले यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातारा पालिका निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने पोवई नाक्यावर वृषालीराजे भोसले यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक घातला. त्यानंतर प्रसारमाध्यमासमोर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था, पाण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडविण्यासाठी, जनतेला मदत करण्यासाठी मी साताऱ्यात आले असल्याचे त्या म्हणाल्या.वृषालीराजे भोसले म्हणाल्या, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यात माझा जन्म झाला, हे मी माझे भाग्य समजते. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत. केवळ अभिषेक, पूजा करून शिवजयंती साजरी करून चालणार नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या सर्वांना काम करावे लागेल.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे असलेली स्वयंशिस्त आजच्या तरुण पिढीने आपल्या अंगी बाणवायला हवी. शिवरायांनी स्वराज्याचे ध्येय मनात ठेवलं आणि ते साकारलं. त्याच पद्धतीने आपणही ध्येय मनात ठेवून त्या दृष्टीने वाटचाल करावी. सातारकरांना मदत करण्यासाठी मी साताऱ्यात आली आहे. सातारा शहरामध्ये रस्ते, पाणी अशा छोट्या-छोट्या समस्यांना जनतेला सामोरे जावे लागत आहे. जनतेच्या मनामध्ये या समस्यांमुळे चिंतेचे वातावरण आहे, त्या दूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेPoliticsराजकारण