शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पोहताना बंधाऱ्यात बुडून दोघा युवकांचा मृत्यू, सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद

By नितीन काळेल | Updated: August 16, 2023 15:46 IST

सातारा : सातारा शहराजवळील दरे खुर्द गावच्या हद्दीत बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून दोघां युवकांचा मृत्यू झाला. संबंधित मित्रांसह पोहायला गेले ...

सातारा : सातारा शहराजवळील दरे खुर्द गावच्या हद्दीत बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून दोघां युवकांचा मृत्यू झाला. संबंधित मित्रांसह पोहायला गेले होते. हा प्रकार स्वातंत्र्यदिनी दुपारच्या सुमारास घडला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सुनील रामचंद्र मोरे (मूळ रा. कडवे, ता. पाटण. सध्या रा. जानकर काॅलनी दरे खुर्द) यांनी पोलिसांत खबर दिली आहे. तर स्वप्नील सुनील मोरे (वय १५, रा. दरे खुर्द) आणि अमोल शंकर जांगळे १६, रा. चिपळूणकर बाग, मंगळवार पेठ सातारा) अशी मृत युवकांची नावे आहेत.पोलिसांनी सांगितले की, दि. १५ आॅगस्ट रोजी दुपारी साडे बाराच्या नंतर हा प्रकार घडून आला. दरे खुर्द गावच्या हद्दीत जानकर काॅलनी येथे बंधारा आहे. या बंधाऱ्यात पाणी होते. या बंधाऱ्यातील पाण्यात काही मित्र पोहायला गेले होते. त्यावेळी स्वप्नील मोरे आणि अमोल जांगळे हेही बंधाऱ्यातील पाण्यात उतरले. पोहताना पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.सातारा तालुका पोलिस ठाण्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याबाबत नोंद झाली आहे. हा प्रकार कसा घडला याबाबत माहिती घेण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चव्हाण हे अधिक माहिती घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी