शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कामगारांनीच रचला रोकड लुटीचा कट, चौघांना अटक; चोवीस तासांत गुन्ह्याचा छडा

By दत्ता यादव | Updated: December 2, 2023 19:07 IST

सातारा: एका औषध कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी आपल्या इतर दोन सहकाऱ्यांच्या मदतीने लाखाची रोकड लुटल्याची धक्कादायक बाब भुईंज ...

सातारा: एका औषध कंपनीमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी आपल्या इतर दोन सहकाऱ्यांच्या मदतीने लाखाची रोकड लुटल्याची धक्कादायक बाब भुईंज पोलिसांच्या तपासात उघड झाली. अवघ्या चोवीस तासांत भुईंज पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून चाैघांनाही अटक केली. त्यांच्याकडून लुटीची एक लाख ४ हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आली.राहुल अंकुश गोळे (वय २६), ओमकार रमेश गोळे (वय १८), अभिजित अंकुश गोळे (वय ३४, सर्व रा. जानकर काॅलनी, मंगळवार पेठ, सातारा), मयूर आनंदराव किर्दत (वय ३२, रा. करंजे पेठ, सातारा) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकाश दिलीप बोडके (वय २१, रा. महागाव, ता. सातारा) राहुल गोळे आणि मयूर किर्दत हे तिघे एकाच औषध वितरण करणाऱ्या कंपनीमध्ये काम करतात. या तिघांकडे औषध वितरीत केल्यानंतर त्याचे पैसे वसूल करण्याचे काम होते. ३० नोव्हेंबर रोजी हे तिघे औषधांचा टेम्पो घेऊन वाई ते पाचवड मार्गे निघाले. वाटेत आसले गावाजवळ रस्त्याच्याकडेला टेम्पो थांबवून दारू पिण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्याने गाडीची काच फोडून पिशवीतील १ लाख ४ हजारांची रोकड होतोहात गायब केली.याबाबत भुईंज पोलिस ठाण्यात आकाश बोडके याने फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला. यातील फिर्यादी आकाश आणि राहूल गोळे, मयूर किर्दची त्यांनी कसून चाैकशी केली. त्यावेळी तिघांच्याही बोलण्यात विसंगत आढळून आली. त्यामुळे इथे काही तरी काळे बेरे आहे, याचा दाट संशय पोलिसांना आला.पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन त्यांची चाैकशी केली असता हा कट मयूर किर्दत आणि राहुल गोळे या दोघांनी रचला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. राहुल हा टेम्पो चालक म्हणून काम करत होता. तर मयूर हा शेजारी बसून पैशाचे व्यवहार सांभाळत होता. या दोघांनी ओमकार गोळे आणि अभिजित गोळे यांना बोलावून घेऊन कट तडीस नेला. मात्र, पोलिसांनी काैशल्याने हा गुन्हा अवघ्या चोवीस तासांत उघडकीस आणला.ते दोघे सतत फोनवर..संशयित राहूल गोळे आणि मयूर किर्दत हे दोघे सतत त्यांच्या सहकाऱ्यांशी फोनवर संपर्कात होते. टेम्पो कुठपर्यंत आला आहे. याची माहिती दोघे त्यांच्या सहकाऱ्यांना देत होते. गाडीत लाखापर्यंत रक्कम वसूल झाल्यानंतर त्यांनी लुटीचा कट रचला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस