शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
3
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
4
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
5
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
6
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
7
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
8
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
9
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
10
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
11
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
12
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
13
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
14
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
15
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
16
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
17
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
18
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
19
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
20
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कंटेनरमध्ये कोळशाची ऊब घेणे कामगारांच्या जीवावर बेतले, दोघांचा गुदमरुन मृत्यू; महाबळेश्वरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:34 IST

रात्री झोपताना ऊब घेण्यासाठी कोळसा आणून घमेल्यात ठेवून पेटवला

महाबळेश्वर : थंडी वाजू नये म्हणून कोळसा घमेल्यामध्ये ठेवून ऊब घेणे कामगारांच्या जीवावर बेतले. कंटेनरमध्ये रात्री झोपेतच दोघांचा गुदमरुन दुर्देवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना महाबळेश्वर तालुक्यातील अहिरमुरा येथे दि. ३० रोजी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली. मतिऊर रेहमान (वय ५३, रा. सिसवा, बिहार) व विपिन तिवारी (वय ५५, रा. गोपालगंज, बिहार) अशी गुदमरून मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहितीनुसार महाबळेश्वर तालुक्यातील गाढवली ते उत्तरेश्वर या मार्गाचे खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी चार कामगार काम करत आहेत. हे कामगार कंटेनरमध्ये रात्री झोपत असत. महाबळेश्वर परिसरात थंडीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांनी रात्री झोपताना ऊब घेण्यासाठी कोळसा आणून घमेल्यात ठेवून पेटवला. हे घमेले पायाजवळ ठेवून दोघेही रात्री झोपी गेले. मात्र, लवकर उठणारे हे दोघे सकाळी साडेआठपर्यंत का झोपले आहेत, हे पाहण्यासाठी इतर दोन कामगार कंटेनरमध्ये गेले. त्यावेळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत त्यांना दिसले.काही नागरिकांना बोलावून त्यांनी दोघांनाही तातडीने तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. डाॅक्टरांनी दोघांनाही तपासले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. बंद कंटेनरमध्ये कोळशाच्या धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची महाबळेश्वर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, दोघांचाही शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे.सावधगिरी बाळगण्याचे आवाहनथंड हवामानात ऊबेसाठी कोळसा किंवा धूर निर्माण करणारी साधने बंद जागेत वापरणे अत्यंत धोकादायक आहे. राज्यभरात यापूर्वी बऱ्याचजणांचा अशाप्रकारे जीव गेला आहे. थंडीच्या दिवसांत नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Coal fumes in container kill two laborers in Mahabaleshwar.

Web Summary : In Mahabaleshwar, two laborers died of suffocation inside a container while using coal for warmth. They were found unconscious by coworkers and declared dead at a local hospital. Police are investigating the incident and caution against using coal in enclosed spaces.