लिफ्ट दिलेल्या दोघांनी मोबाईल चोरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:02 IST2021-01-08T06:02:33+5:302021-01-08T06:02:33+5:30

सातारा : चंदननगर-कोडोली येथे लिफ्ट दिलेल्या दोघांनीच दुचाकीस्वाराचा ४४ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला. या प्रकरणी दोघांवर शहर पोलीस ...

The two who gave the lift stole the mobile | लिफ्ट दिलेल्या दोघांनी मोबाईल चोरला

लिफ्ट दिलेल्या दोघांनी मोबाईल चोरला

सातारा : चंदननगर-कोडोली येथे लिफ्ट दिलेल्या दोघांनीच दुचाकीस्वाराचा ४४ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला. या प्रकरणी दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अभिजित अशोक भिसे, जीवन शहाजी रावते (दोघे रा. दत्तनगर, कोडोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत किरण धुळा देवकाते (वय २०, रा. धनगरवाडी, कोडोली ) याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. ४) दुपारी चारच्या सुमारास किरण हा चंदननगर येथून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी दोघांनी त्याच्याकडे लिफ्ट मागितली. तेव्हा अभिजितने तुझ्या वडिलांना फोन करायचा आहे, असे सांगून माझा मोबाईल मागून घेतला. त्यानंतर त्याने तो जीवनकडे दिला. नंतर दोघांनी तेथून पळ काढला, असे किरण याने फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार जाधव हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The two who gave the lift stole the mobile