कुमठे फाट्यानजीक अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:37 IST2021-03-08T04:37:11+5:302021-03-08T04:37:11+5:30
कोरेगाव : कोरेगाव शहरानजीक कुमठे फाटा येथे भरधाव दुचाकी ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली येऊन झालेल्या अपघातात अभिजित भरत गोसावी ...

कुमठे फाट्यानजीक अपघातात दुचाकीस्वार ठार
कोरेगाव : कोरेगाव शहरानजीक कुमठे फाटा येथे भरधाव दुचाकी ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली येऊन झालेल्या अपघातात अभिजित भरत गोसावी (वय २८, रा. बिजवडी, ता. माण) हा जागीच ठार झाला. कोरेगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ट्रॅक्टर-ट्रॉली (एमएच ११ सी डब्ल्यू ५२१०) जरंडेश्वर शुगर मिल्सकडे ऊस घेऊन चालली होती. याचवेळी कुमठे फाट्यानजीक समोरुन भरधाव वेगाने दुचाकी (एमएच ११ सीपी ७५१४) आली. रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार अभिजित गोसावी याने जोरात ब्रेक लावला. यावेळी दुचाकी घसरली आणि ती ट्रॉलीच्या चाकाखाली आली. डोक्यावरुन चाक गेल्याने गोसावी याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी कुमठे येथील पोलीस पाटील धनंजय जगदाळे यांनी फिर्याद दिली असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक विशाल कदम तपास करत आहेत.