जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:19+5:302021-03-25T04:37:19+5:30

साताराः जिल्ह्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दुचाकी चोरीचे प्रमाण सुरुच आहे. फलटण, ...

Two-wheeler thieves abound in the district | जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

साताराः जिल्ह्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दुचाकी चोरीचे प्रमाण सुरुच आहे. फलटण, सातारा शहर, सातारा तालुक्यातील आरळे येथून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. जिल्ह्याच्या विविध भागातून दररोज कुठे ना कुठेतरी एक अथवा दोन दुचाकी चोरी होत असल्यामुळे दुचाकीधारकही अस्वस्थ आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे पोलिसांपुढेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जिल्ह्यात दररोज होणाऱ्या दुचाकी चोरींमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

फलटण येथील सुरभी हॉटेल शेजारील घडसोली मैदान परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार रामदास दिलीप सोनवले (वय ३०, रा. ठाकूरकी, फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना दि. ८ मार्च रोजी घडली आहे. दुचाकी चोरीला गेल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी शोधाशोध केली, मात्र त्यांना दुचाकी आढळून आली नाही. फलटण पोलीस ठाण्यात याची तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक लावंड करत आहेत.

सातारा शहरालगत असणाऱ्या गोडोली येथील माऊली हॉस्पिटलजवळील सिद्धाली गार्डनमध्ये पार्क केलेली दुचाकी (एमएच ११ - सीएल २६६५) चोरुन नेल्याची तक्रार संदेश कृष्णा फडतरे (वय ३०, रा. गोडोली, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दि. ९ मार्च ते १५ मार्च या कालावधीत घडली असून अधिक तपास हवालदार जाधव करत आहेत.

सातारा तालुक्यातील आरळे येथून मंगळवार, दि. २३ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकी (एमएच १६ - सीटी ४१५५) चोरुन नेल्याची तक्रार अमोल विजय पवार (वय १९, सध्या रा. आरळे, सातारा. मूळ रा. देवी धामणगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) या ऊसतोडणी मजुराने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार जाधव करत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरांच्या टोळ्याही ताब्यात घेण्यात आल्या तरीही दुचाकी चोरी थांबत नसल्याने वाहनधारक हतबल झाले आहेत.

Web Title: Two-wheeler thieves abound in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.