दुचाकी चोरट्यास शिताफीने अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:26 IST2021-06-10T04:26:51+5:302021-06-10T04:26:51+5:30

दहिवडी : दुचाकी चोरट्यांना दहिवडी पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, चोरीस गेलेल्या दुचाकीचा एक आठवड्यातच शोध लावण्यात यश आले ...

Two-wheeler thief arrested by Shitafi | दुचाकी चोरट्यास शिताफीने अटक

दुचाकी चोरट्यास शिताफीने अटक

दहिवडी : दुचाकी चोरट्यांना दहिवडी पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, चोरीस गेलेल्या दुचाकीचा एक आठवड्यातच शोध लावण्यात यश आले आहे.

याबाबतची माहिती अशी चैतन्य कुंभार (रा.मलवडी, ता.माण) यांची दुचाकी त्यांच्या राहत्या घरासमोरून ३० मे रात्री दहा ते ३१ मे सकाळी सातच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबतची फिर्याद त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात नोंदविली. या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी विविध ठिकाणी तपास करण्यास सुरुवात केली. चैतन्य कुंभार हे नातेपुतेला जात असताना, ही दुचाकी घेऊन एक व्यक्ती दहिवडी-नातेपुते रस्त्याच्या बाजूला उभी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ही बाब पोलीस ठाण्यात कळविली.

संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता, अल्पवयीन मुलगा दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक हजारे व प्रकाश हांगे, हवालदार संजय केंगले व रवींद्र बनसोडे यांनी शिताफीने दोन्ही चोरट्यास ताब्यात घेण्यात यश मिळविले.

Web Title: Two-wheeler thief arrested by Shitafi