राजवाडा भाजी मंडईतून दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST2021-03-28T04:36:29+5:302021-03-28T04:36:29+5:30
सातारा : शहरात असणाऱ्या राजवाडा भाजी मंडईत पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ...

राजवाडा भाजी मंडईतून दुचाकी चोरी
सातारा : शहरात असणाऱ्या राजवाडा भाजी मंडईत पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, चंद्रकांत नारायण आवळे (५४, रा. चिपळूणकर बागेेशेजारी, मंगळवार पेठ, सातारा) हे भाजी व्यावसायिक असून त्यांनी दुचाकी (एम. एच. ११ - बी. सी. ३३८०) ही रविवार, २१ रोजी दुपारी साडेचार वाजता राजवाडा भाजी मंडईच्या पार्कमध्ये लावली होती. मात्र, रात्री सव्वानऊ वाजता त्यांना पार्क केलेल्या ठिकाणी दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता ती कुठे आढळली नाही. यानंतर त्यांनी शुक्रवार, दि. २६ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली असून याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक घोडके हे करीत आहेत.