शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पे अ‍ॅण्ड पार्कमधून दुचाकीची चोरी, माहुली रेल्वे स्थानकातील घटना : काळजीवाहकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 15:42 IST

माहुली रेल्वेस्थानकातील पे अ‍ॅण्ड पार्कमधून दुचाकी चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी काळजीवाहकावर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपे अ‍ॅण्ड पार्कमधून दुचाकीची चोरी, माहुली रेल्वे स्थानकातील घटना काळजीवाहकावर गुन्हा

सातारा : माहुली रेल्वेस्थानकातील पे अ‍ॅण्ड पार्कमधून दुचाकी चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी काळजीवाहकावर गुन्हा दाखल केला आहे.रामजी श्रीरंग पवार (रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या काळजीवाहकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हणमंत लक्ष्मण निकम (वय ५४, रा. वाढे, ता. सातारा) यांनी दि. १८ ते १९ सप्टेंबर दरम्यान माहुली रेल्वे स्टेशन येथील पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये दुचाकी उभी केली होती. त्यावेळी काळजीवाहक म्हणून तेथे रामजी पवार हा काम पाहत होता.

निकम हे गावावरून पुन्हा शुक्रवारी आले असता त्यांना दुचाकी नसल्याचे दिसून आले. त्यांनी रितसर पावती घेतली होती. असे असताना दुचाकी चोरीस गेली कशी, असा प्रश्न त्यांना पडला. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सहायक फौजदार विष्णू खुडे याबाबत अधिक तपास करत आहेत.मटका अड्ड्यावर छापा; एकजण ताब्यातरामनगर, ता. सातारा येथे एका गाळ्यामध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ हजार ५७ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.शुभम उध्व इंदलकर (वय २४, रा. कळंबे, ता. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रामनगर येथील एका गाळ्यामध्ये शुभम इंदलकर हा लोकांकडून आकड्यावर पैसे घेऊन मटका चालवत होता.

याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे शुक्रवारी दुपारी छापा टाकला. शुभमला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून मटक्याचे साहित्य आणि रोकड पोलिसांनी जप्त केली. हवालदार सुजीत पांडुरंग भोसले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर