कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:35 IST2021-03-15T04:35:47+5:302021-03-15T04:35:47+5:30

सातारा : सातारा तालुक्यातील पाटखळ माथा येथे कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी झाला. ...

Two-wheeler seriously injured in car crash | कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

सातारा : सातारा तालुक्यातील पाटखळ माथा येथे कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी झाला. या प्रकरणी कारचालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिजित नंदकुमार सोनमळे (वय २८, रा. लिंंब, ता. सातारा) यांचे चुलते वसंत परबती सोनमळे हे शुक्रवारी (दि.१२) त्यांच्या दुचाकीवरून निघाले होते. पाटखळ माथा येथील कदम पेट्रोल पंपासमोर लोणंद-सातारा रस्त्यावर ते आले असताना समोरून आनंदराव बबनराव धुमाळ (रा. गेंडामाळ, शाहूपुरी, सातारा) हे कारने (एमएच ०४-सीबी ८३३६) भरधाव आले. त्यात कारची दुचाकीला जोरदार धडक बसली. यामध्ये वसंत सोनमळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी अभिजित सोनमळे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर कारचालक आनंदराव धुमाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Two-wheeler seriously injured in car crash