शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात दुचाकी चोरणारी टोळी अटकेत, सात मोटारसायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 16:40 IST

सातारा शहर व परिसरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. किरण वसंत चव्हाण (वय २०,रा. गोपाळवस्ती झोपडपट्टी, सातारा) याच्यासह एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात दुचाकी चोरणारी टोळी अटकेतसात मोटारसायकली जप्त; गुन्हे प्रकटीकरणची कारवाई

सातारा: शहर व परिसरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. किरण वसंत चव्हाण (वय २०,रा. गोपाळवस्ती झोपडपट्टी, सातारा) याच्यासह एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरात आणि परिसरात दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पथके तैनात केली. त्यातील एक पथक अजंठा चौकात शुक्रवारी सायंकाळी वाहनांची तपासणी करत होते.

यावेळी कऱ्हाड बाजूकडून किरण चव्हाण हा दुचाकीवरून आला. त्याला पोलिसांनी अडवले. गाडीची कागदपत्रे आणि वाहन चालविण्याचा परवाना मागितला. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना त्याची शंका आली. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याजवळ असलेली दुचाकी चोरीची असल्याचे पुढे आले.

त्याला पोलीसीखाक्या दाखविताच त्याने त्याच्या दुसऱ्या साथीदाराचेही नाव पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाला विलासपूर गोडोली येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या. अशा प्रकारे एकूण सात दुचाकी दोघांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत १ लाख ४७ हजार रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांकडे पोलीस कसून चौकशी करत असून, या दोघांचे आणखी कोण साथीदार आहे का, याचीही माहिती घेत आहेत.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक एस.सी. पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, पोलीस नाईक मुनिर मुल्ला, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, सुनिल भोसले, अनिल स्वामी, निलेश गायकवाड, संतोष भिसे, धीरज कुंभार, शिवाजी भिसे, डुबल, सचिन माने यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर