शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात मतदान जागृतीसाठी अधिकारी दुचाकीवर; अनेक गावांतून मार्गस्थ..

By नितीन काळेल | Updated: May 3, 2024 20:20 IST

नागरिकांचाही मोठा सहभाग : १०० टक्के मतदानासाठी प्रशासन प्रयत्नशील 

सातारा : लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करत असून शुक्रवारी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शेकडोंच्या संख्येने नागरिकही सहभागी झाले होती. ही रॅली अनेक गावांतून मार्गस्थ झाल्याने मतदानाबाबत जागृती होण्यास मदत झाली.सातारा लोकसभा मतदारसंघासाठी दि. ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी आतापर्यंत पर्यटनस्थळी जागृती, मानवी साखळी आदींद्वारे मतदारांत जनजागृती करण्यात आलेली आहे. आता स्वीप कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी रॅली काढण्यात आली.साताऱ्यात जिल्हा परिषद मैदानावरुन या दुचाकी रॅलीला सुरूवात झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले आदींसह अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.साताऱ्यातील ही रॅली पोवई नाका, मोळाचा ओढा, वर्ये, नेले, किडगाव, कळंबे, माळ्याचीवाडी, साबळेवाडी, कोंडवेमार्गे साताऱ्यात आली. या रॅलीत सुमारे ७०० दुचाकींचा समावेश होता. तसेच जिल्ह्याच्या इतर तालुक्याच्या ठिकाणीही या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले. त्यामुळे मतदानाबाबत मोठी जनजागृती होण्यास मदत झाली. ही रॅलीने १५ ते २० किलोमीटरचे अंतर पार केले. तसेच अनेक गावांतूनही मार्गस्थ झाली.

शनिवारी जागृतीसाठी गृहभेट कार्यक्रमजिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार जागृतीचे काम निवडणुकीच्या शेवटच्या तासापर्यंत केले जाणार आहे. या अंतर्गतच आता दि. ४ मे रोजी गृहभेट दिवस ठेवण्यात आलेला आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी तसेच निवास परिसरात गृहभेटी देणार आहेत. यातून मतदारांत मतदानाविषयी जागृती करावी लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४