कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:41 IST2021-03-17T04:41:00+5:302021-03-17T04:41:00+5:30

कावली वंमशी किरण (रा. एम्पायर हिल, आगाशिवनगर) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सचिन कचरू गायकवाड (रा. आगाशिवनगर) ...

Two-wheeler killed in container collision | कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

कावली वंमशी किरण (रा. एम्पायर हिल, आगाशिवनगर) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सचिन कचरू गायकवाड (रा. आगाशिवनगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कंटेनर भरधाव चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटेनर चालकावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास भेदा चौक ते पोपटभाई पेट्रोलपंप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर झेंडा चौकात भरधाव कंटेनरवरील (क्र. एमएच ४६ बीबी ७७०५) चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील कावली किरण मयत झाले. तर सचिन गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. संशयित कंटेनर चालकाविरोधात कऱ्हाड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two-wheeler killed in container collision