तोंडलजवळील अपघातात दुचाकीचालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST2021-02-08T04:34:30+5:302021-02-08T04:34:30+5:30
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील तोंडल हद्दीमध्ये एका पेट्रोलपंपासमोर दुचाकी व दूध टँकर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला ...

तोंडलजवळील अपघातात दुचाकीचालक जखमी
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील तोंडल हद्दीमध्ये एका पेट्रोलपंपासमोर दुचाकी व दूध टँकर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. आनंदा साळुंखे (वय ५५, रा. दापकेघर, ता. खंडाळा) असे जखमी झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.
दापकेघर, ता. खंडाळा येथील आनंदा साळुंखे हे मुलीला भेटण्याकरिता महुडे, ता. भोर जि. पुणे या ठिकाणी दुचाकीवरून (क्र. एमएच ११ बीजे ९१७९) गेले होते. घरी परत येत असताना लोणंद-शिरवळ रस्त्यावर तोंडल हद्दीमध्ये एका पेट्रोलपंपासमोर दूध भरून फलटण बाजूकडून मुंबईकडे निघालेल्या टँकरने (क्र. एमएच २३ डब्ल्यू ४८५६) त्यांना धडक दिली. यात आनंदा साळुंखे हे गंभीर जखमी झाले. यावेळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने साळुंखे यांना लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत दीपक साळुंखे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस हवालदार संजय जगताप, आप्पासाहेब कोलवडकर करीत आहेत.