साताºयातील दोघेजण कार अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:11 IST2017-09-18T01:11:42+5:302017-09-18T01:11:42+5:30

Two of the victims were killed in a car accident | साताºयातील दोघेजण कार अपघातात ठार

साताºयातील दोघेजण कार अपघातात ठार



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : नागपूर येथे होणाºया जलतरण स्पर्धेसाठी मुलांना घेऊन जात असताना भरधाव कार ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात थेट पुलावर धडकली. यामध्ये सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक गाडे यांच्यासह जलतरणपटू अथर्व शिंदेचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघेजण गंभीर जखमी असून, हा अपघात नागपूर-अमरावती महामार्गावरील राजणी शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास झाला.
नागपूर जिल्ह्यातील कामाठी येथे रविवारी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा होत्या. या स्पर्धेसाठी साताºयाहून कारने (एमएच ११ बीएच ४३८३) दीपक विठ्ठल गाडे (वय ४०, मूळ रा. तरडगाव, ता. फलटण, सध्या रा. शनिवार पेठ, सातारा), त्यांचे सहकारी मित्र अ‍ॅड. नितीन आनंद माने (४३), त्यांचा मुलगा ओम, आमदार शशिकांत शिंदे यांचा चुलत नातू अथर्व मिलिंद शिंदे (११) असे चौघेजण निघाले होते.
त्यांची भरधाव कार नागपूर-अमरावती मार्गावरील राजणी शिवारात आली असता ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पुलाच्या कठड्याला जोरदार आदळली. यात अ‍ॅड. दीपक गाडे व जलतरणपटू अथर्व यांचा जागीच मृत्यू झाला. कारचालक नितीन माने आणि त्यांचा मुलगा अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमींना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कारंजा(घाडगे) पोलीस ठाण्याचे नीरज लोही व रंजन पाटील यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त कार ताब्यात घेऊन पंचनामा केला.

Web Title: Two of the victims were killed in a car accident